'ज्या गोष्टी बोलू नयेत त्याच...', घटस्फोटांच्या अफवांवर अखेर गोविंदाने सोडलं मौन, सांगितली सुनिताची खटकणारी गोष्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Govinda Sunita divorce : एका अभिनेत्रीमुळे ३८ वर्षांचे त्यांचे वैवाहिक नाते तुटण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर, गोविंदाने या सर्व अफवांवर मौन सोडलं आहे.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडचे एकेकाळचा सुपरस्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत होते.
advertisement
2/8
एका अभिनेत्रीमुळे ३८ वर्षांचे त्यांचे वैवाहिक नाते तुटण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर, गोविंदाने या सर्व अफवांवर पूर्णविराम लावत, पत्नी सुनीतासोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
3/8
काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच' या टॉक शोमध्ये गोविंदाने पहिल्यांदाच या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. त्याने सुनीताला आपल्या घराचा आधार म्हटले आहे.
advertisement
4/8
गोविंदा म्हणाला, "ती स्वतः एक लहान मूल आहे. माझी मुलं माझ्या पत्नीला एका मुलाप्रमाणे सांभाळतात." तो पुढे म्हणाला, "सुनीता मुलासारखी आहे, पण ती आमचं घर व्यवस्थित सांभाळू शकली, कारण ती जशी आहे तशीच आहे. ती एक प्रामाणिक मूल आहे."
advertisement
5/8
गोविंदाने पुढे कबूल केले की, सुनीताची एक सवय त्याला खटकते. तो म्हणाला, "तिच्या गोष्टी कधीच चुकत नाहीत, फक्त ती अशा काही गोष्टी बोलते ज्या तिने बोलू नयेत." यावर गोविंदाने पुरुषांच्या विचारसरणीवरही मत मांडले. तो म्हणाला "पुरुषांची समस्या अशी आहे की ते अशा प्रकारे विचार करू शकत नाहीत. माझे नेहमीच मत आहे की पुरुष घर चालवतात, पण स्त्रिया संपूर्ण जग चालवतात."
advertisement
6/8
गोविंदाला जेव्हा विचारले गेले की सुनीता त्याची चूक नेहमी सांगते का, तेव्हा गोविंदाने आपल्या खास शैलीत उत्तर दिले. तो म्हणाला, "तिने स्वतः खूप चुका केल्या आहेत..."
advertisement
7/8
गोविंदाने पुढे हसत-खेळत खुलासा केला, "मी तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला अनेकदा माफ केले आहे." या विधानावरून त्यांच्या नात्यात छोटे-मोठे वाद होतात, पण ते प्रेम आणि समजूतदारपणाने सोडवले जातात, हे स्पष्ट होते.
advertisement
8/8
गोविंदा आणि सुनीता यांनी गुपचूप लग्न केले होते आणि १९८९ मध्ये मुलगी टीना आहुजाचा जन्म होईपर्यंत त्यांनी लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. त्यांचा मुलगा यशवर्धन लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ज्या गोष्टी बोलू नयेत त्याच...', घटस्फोटांच्या अफवांवर अखेर गोविंदाने सोडलं मौन, सांगितली सुनिताची खटकणारी गोष्ट