TRENDING:

Mayuri Wagh : घटस्फोटाच्या 6 वर्षांनी लग्न करणार मयुरी वाघ? पुन्हा प्रेमात पडण्याबद्दल स्पष्टच बोलली, 'एखादी व्यक्ती...'

Last Updated:
Mayuri Wagh Divorce Controversy : घटस्फोटाच्या अनेक वर्षांनी मयुरीने विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलचा संघर्ष अगदी मोकळेपणाने शेअर केला आहे.
advertisement
1/8
घटस्फोटाच्या 6 वर्षांनी लग्न करणार मयुरी वाघ? पुन्हा प्रेमात पडण्याबद्दल म्हणाली
मराठी मालिका </a>विश्वातील एक सोज्वळ चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मयुरी वाघ हिने 'अस्मिता' या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. " width="750" height="938" /> मुंबई: मराठी मालिका विश्वातील एक सोज्वळ चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मयुरी वाघ हिने 'अस्मिता' या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले.
advertisement
2/8
याच मालिकेच्या सेटवर तिचा आणि अभिनेता पियुष रानडे यांची ओळख झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न केले. मात्र, लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतच त्यांचे नाते तुटले आणि त्यांचा घटस्फोट झाला. या धक्क्यातून सावरण्यासाठी मयुरीला खूप मोठा संघर्ष करावा लागला.
advertisement
3/8
घटस्फोटाच्या अनेक वर्षांनी मयुरीने 'मित्र म्हणे' या युट्युब चॅनलला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलचा संघर्ष अगदी मोकळेपणाने शेअर केला आहे. सेपरेशनच्या काळात वैयक्तिक आयुष्यात जे चढउतार आले, त्याबद्दल ती बोलली.
advertisement
4/8
मयुरी म्हणाली, "माझा निर्णय चुकला, हे लग्नानंतर काही महिन्यांतच माझ्या आई-वडिलांना समजलं होतं. पण माझं मन ते सगळं स्वीकारायला तयार नव्हतं. मला वाटायचं की, असं काही होऊच शकत नाही. मी वेळोवेळी स्वतःच्या मनाची समजूत घालत राहिले."
advertisement
5/8
'आता आयुष्यात पुढे जाण्याचा किंवा दुसऱ्या जोडीदाराचा विचार केला आहे का?' या प्रश्नावर मयुरी खूप भावूक झाली. ती म्हणाली, "आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण जात आहे."
advertisement
6/8
तिने अत्यंत धक्कादायक खुलासा करताना सांगितले, "एखादी व्यक्ती माझ्यावर हात उचलतेय, हे कसं काय घडू शकतं? हे मला पचवणं खूप कठीण होतं. मी कायदेशीर गोष्टी सुद्धा करू शकले असते, पण काहीच केलं नाही. कारण मी सतत दडपणाखाली होते. आता कोणत्या गोष्टीवरून वाद होईल, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल, याचा काहीच अंदाज नव्हता."
advertisement
7/8
या सगळ्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी तिला खूप वेळ लागला. या काळात तिने स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवले होते. 'आता मयुरी वाघसाठी प्रेमाची व्याख्या काय आहे?' असे विचारल्यावर तिने एका शब्दात उत्तर दिले, ते म्हणजे 'आदर'.
advertisement
8/8
मयुरी म्हणाली, "रिलेशनशिपमध्ये आदर आणि विश्वास या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण चारचौघांत समोरच्या व्यक्तीचा आदर करणं महत्त्वाचं असतं." भविष्यात कोणावरही लगेच विश्वास ठेवणे आता कठीण जात असल्याचे तिने सांगितले. तथापि, 'अस्मिता' नंतर मयुरी 'अबोली' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mayuri Wagh : घटस्फोटाच्या 6 वर्षांनी लग्न करणार मयुरी वाघ? पुन्हा प्रेमात पडण्याबद्दल स्पष्टच बोलली, 'एखादी व्यक्ती...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल