TRENDING:

'प्रेतांवर उभी राहिलेली ती जागा', महेश मांजरेकर आजही 'त्या' ठिकाणी जात नाहीत, अजूनही उडतो थरकाप

Last Updated:
महेश मांजरेकर यांनी फिनिक्स मॉलला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिल कामगारांच्या आठवणींमुळे त्यांना तिथे जायला त्रास होतो, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
advertisement
1/9
'प्रेतांवर उभी राहिलेली ती जागा', महेश मांजरेकर आजही 'त्या' ठिकाणी जात नाहीत
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे महेश मांजरेकर. अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, निर्माते अशी बहुमुखी भूमिका बजावणाऱ्या महेश मांजरेकरांनी मराठीसह बॉलिवूडला अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले.
advertisement
2/9
आपल्या सिनेमातून वास्तव दाखवण्याचा प्रयत्न ते करत आले आहेत. इतकंच नाही, तर चित्रपटातून एखादी कथा सांगत असताना ते समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचंही काम करतात.
advertisement
3/9
लवकरच महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या ते चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.
advertisement
4/9
नुकतंच महेश मांजरेकर यांनी झी २४ तासला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांचे चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
advertisement
5/9
मुलाखतीत बोलताना मांजरेकरांनी एका मॉलचा उल्लेख करत त्यांच्या मनातील भीती बोलून दाखवली आहे. महेश मांजरेकरांनी सांगितलं की, तरुणपणी ते गिरणी कामगारांच्या मुलांसोबत क्रिकेट खेळायचे. त्यांच्या आयुष्यात गिरणी कामगारांचा एक मोठा भाग होता.
advertisement
6/9
यावेळी मांजरेकरांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "त्यावेळी एक नाटक आलेलं 'आमच्या या घरात' नावाचं. त्यावरून मी एक फिल्म लिहिली. आमचं त्यावेळचं जे आयुष्य होतं, माझे गिरणी कामगार मित्र होते, त्याचा त्रास मला अजूनही होतो."
advertisement
7/9
"मी आजही फिनिक्स मॉलला जात नाही, तिथे शॉपिंग करत नाही. माझी बायको आणि मुली जातात, पण मी जात नाही. माझं म्हणणं आहे की, इथे खूप लोकं मेली आहेत. हे जे उभं राहिलं आहे ते कोणाच्या तरी प्रेतांवर उभी राहिलेली जागा आहे, असं माझं कायम म्हणणं आहे. त्यामुळे मी कधीच फिनिक्स मॉलमध्ये जात नाही, साधा एक रुमालही घेत नाही."
advertisement
8/9
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, "हे एक प्रकारे माझं आंदोलन आहे. मला त्याचा त्रास होतो. आज कुठे आहेत ते गिरणी कामगार, त्यांना काय मिळालं? तर काहीच नाही."
advertisement
9/9
"महाराष्ट्राला मुंबई मिळाली, त्यासाठी जो लढा झाला, त्यात लाखो गिरणी कामगार आणि शेतकरी मेले. पण त्याचं प्रतीक फक्त एकच आहे तो म्हणजे तो पुतळा. बाकी काही नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'प्रेतांवर उभी राहिलेली ती जागा', महेश मांजरेकर आजही 'त्या' ठिकाणी जात नाहीत, अजूनही उडतो थरकाप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल