TRENDING:

300 चित्रपट, कोट्यवधींची कमाई; पण सुपरस्टारने मृत्यूनंतर मोलकरणीच्या नावावर केली संपत्ती! कोण होता तो?

Last Updated:
Actor's Tragic Death : एकेकाळी रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम करणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांनी त्यांची संपत्ती वारसदार असतानाही एका मोलकरणीच्या नावावर केली.
advertisement
1/8
300 चित्रपट, कोट्यवधींची कमाई; पण सुपरस्टारने मोलकरणीच्या नावावर केली संपत्ती
मुंबई: अभिनय क्षेत्रात प्रचंड यश मिळवूनही, खासगी आयुष्यात एकटेपणा आणि समस्यांशी संघर्ष करणाऱ्या कलाकारांची कथा चित्रपटसृष्टीत नवी नाही. दक्षिण भारतीय सिनेमातील असेच एक मोठे नाव म्हणजे दिवंगत अभिनेते तिरुमाला सुंदर श्री रंगनाथ.
advertisement
2/8
एकेकाळी रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम करणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट अत्यंत दुःखद पद्धतीने केला, तसेच त्यांची संपत्ती वारसदार असतानाही एका मोलकरणीच्या नावावर केली.
advertisement
3/8
१९४६ साली मद्रास येथे जन्मलेल्या रंगनाथ यांनी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी भारतीय रेल्वेत TC म्हणून नोकरी केली होती. मात्र, लहानपणापासून असलेले अभिनेता होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.
advertisement
4/8
१९६९ मध्ये 'बुद्धिमंतुडु' या चित्रपटातून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 'चंदना', 'मनमधुडु', 'निजाम', 'अदावी रामुडु' यांसारख्या हिट चित्रपटांत त्यांनी नायक, सह-अभिनेता आणि अनेकदा खलनायकाची दमदार भूमिका साकारली.
advertisement
5/8
करिअरमध्ये यश मिळूनही रंगनाथ खासगी आयुष्यात सुखी नव्हते. त्यांची पत्नी चैतन्य यांचा एक भीषण अपघात झाला होता. तब्बल १५ वर्षे रंगनाथ यांनी पत्नीची सेवा केली. याच काळात त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली, ज्यामुळे त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागले.
advertisement
6/8
२००९ मध्ये पत्नी चैतन्य यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पत्नीच्या मृत्यूने रंगनाथ पूर्णपणे खचले आणि ते नैराश्यात गेले. अनेक वर्षे त्यांनी एकटेपणात काढली. अखेरीस, २०१५ मध्ये त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
advertisement
7/8
रंगनाथ यांच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. पोलिसांना त्यांच्या घरात एक सुसाईड नोट सापडली होती. त्या पत्रातील मजकूर धक्कादायक होता. रंगनाथ यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती आणि जमापुंजी आपली मदतनीस मीनाक्षी हिच्या नावावर केली होती!
advertisement
8/8
याबद्दल त्यांच्या मुलीने नंतर खुलासा केला, "मीनाक्षी आमच्या घरी अनेक वर्षे काम करत होती आणि तिने माझ्या आई-वडिलांची शेवटपर्यंत काळजी घेतली. वडिलांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता, म्हणूनच त्यांनी मालमत्ता तिच्या नावावर केली." रंगनाथ यांचे कुटुंबीय मीनाक्षीला कुटुंबातील सदस्यच मानायचे, असे त्यांच्या मुलानेही सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
300 चित्रपट, कोट्यवधींची कमाई; पण सुपरस्टारने मृत्यूनंतर मोलकरणीच्या नावावर केली संपत्ती! कोण होता तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल