खळखळून हसवणाऱ्या 'हास्यजत्रा'च्या कलाकारांनी डोळ्यात आणलं पाणी, दिवाळीत केलं असं काही... तुम्हीही कराल सलाम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Maharashtrachi Hasya Jatra : महाराष्ट्राचा लाडका विनोदाचा मंच म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या कलाकारांनी यंदाची दिवाळी एका खूपच भावनिक आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी केली आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्राचा लाडका विनोदाचा मंच म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या कलाकारांनी यंदाची दिवाळी एका खूपच भावनिक आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी केली आहे.
advertisement
2/7
टीव्हीवर प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे कलाकार, दिवाळीच्या निमित्ताने बोरीवली येथील एका वृद्धाश्रमात पोहोचले आणि त्यांनी तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेतले.
advertisement
3/7
हास्यजत्रेच्या कलाकारांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या जीवनात आपुलकीचा रंग भरण्याचा एक सुंदर प्रयत्न केला. या कार्यक्रमाला मराठमोळा विनोदवीर ओंकार भोजने, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची 'विनोदी क्वीन' वनिता खरात आणि लाडकी अभिनेत्री शिवाली परब यांची प्रमुख उपस्थिती होती.
advertisement
4/7
या कलाकारांनी ज्येष्ठ नागरिकांशी गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि खास 'हास्यजत्रा' शैलीत त्यांना हसवून त्यांच्या चेहऱ्यांवर हास्याने तेज आणले. वृद्धाश्रमातील वातावरण अत्यंत भावूक झाले होते, कारण या कलाकारांनी दिलेला वेळ आणि प्रेम हेच आजी-आजोबांसाठी मोठी भेट होती.
advertisement
5/7
या खास दिवाळी सेलिब्रेशनमध्ये केवळ कलाकारच नव्हते, तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे आधारस्तंभ असलेले दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे हे देखील सहभागी झाले होते.
advertisement
6/7
या संपूर्ण टीमने एकत्र येऊन दाखवून दिले की, दिवाळीचा खरा आनंद केवळ घरात किंवा दिवाळीच्या पार्ट्यांमध्ये नाही, तर गरजू आणि एकट्या लोकांच्या आयुष्यात आनंद वाटून घेण्यात आहे.
advertisement
7/7
टीव्हीवर लोकांना हसवणारे हे लोक, प्रत्यक्षातही लोकांचे दु:ख विसरायला लावणारे क्षण निर्माण करतात, याचा अनुभव वृद्धाश्रमातील नागरिकांनी घेतला. हास्यजत्रेच्या कलाकारांच्या या अनोख्या उपक्रमामुळे सोशल मीडियावर त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कृतीने यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने 'दिवाळी' ठरली!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
खळखळून हसवणाऱ्या 'हास्यजत्रा'च्या कलाकारांनी डोळ्यात आणलं पाणी, दिवाळीत केलं असं काही... तुम्हीही कराल सलाम