TRENDING:

राज ठाकरेंचे मित्र, पण कौतुक उद्धव ठाकरेंचं! माजी मुख्यमंत्र्यांबद्दल महेश मांजरेकर म्हणाले 'राजकीय मतभेद...'

Last Updated:
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांना त्यांच्या आवडत्या राजकीय व्यक्तीबद्दल विचारले असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले.
advertisement
1/7
राज ठाकरेंचे मित्र, पण कौतुक उद्धव ठाकरेंचं! महेश मांजरेकर म्हणाले...
मुंबई: सध्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे चर्चेत असलेले प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा एक खास किस्सा उलगडला आहे. या किस्स्यातून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टाईमिंगचे आणि त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.
advertisement
2/7
झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांना त्यांच्या आवडत्या राजकीय व्यक्तीबद्दल विचारले असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. कोणत्याही व्यक्तीबद्दल राजकीय मतभेद असू शकतात, पण माणूस म्हणून ते वाईट नसतात, असे मांजरेकर म्हणाले.
advertisement
3/7
या भेटीचा किस्सा सांगताना मांजरेकर म्हणाले, "माझ्या मुलीने (सई मांजरेकर) ‘मेजर’ नावाचा सिनेमा केला होता, जो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित होता. त्या सिनेमातील तेलुगू नायक अदिवी शेषला उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा होती. माझ्या मुलीने ही गोष्ट मला सांगितली."
advertisement
4/7
यानंतर, मांजरेकर यांनी आपल्या एका मित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या सचिवांशी संपर्क साधला. भेटीसाठी वेळ विचारली असता, मांजरेकरांनी सांगितले की, १०-१५ मिनिटांसाठी भेटायचे आहे.
advertisement
5/7
मांजरेकर पुढे म्हणाले, "त्यांनी दुपारी १२:३० वाजताची वेळ दिली. मी मित्राला खात्रीने सांगितले की, तो हिरो दिलेल्या वेळेत येईल." त्यावेळी त्यांना सचिवांमार्फत निरोप मिळाला की, भेटीला मांजरेकरसुद्धा सोबत हवे आहेत.
advertisement
6/7
मांजरेकर म्हणाले, "मी आणि माझ्यासोबतचे दोघेजण दिलेल्या वेळेत 'वर्षा' बंगल्यावर गेलो. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मी आत गेलो आणि माझ्यासोबतच्या दोघांना वेटिंग रूममध्ये थांबायला सांगितले. मग मी, माझी मुलगी आणि तो हिरो असे आम्ही तिघे त्यांना भेटायला गेलो."
advertisement
7/7
या भेटीतून मांजरेकर यांनी मुख्यमंत्री पदावर असूनही उद्धव ठाकरे यांनी वेळेचे महत्त्व जपले, याचे कौतुक केले. कोणतीही भेट असो, महेश मांजरेकरांसारख्या दिग्गजांनी सांगितलेला हा किस्सा उद्धव ठाकरेंच्या साधेपणावर प्रकाश टाकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राज ठाकरेंचे मित्र, पण कौतुक उद्धव ठाकरेंचं! माजी मुख्यमंत्र्यांबद्दल महेश मांजरेकर म्हणाले 'राजकीय मतभेद...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल