'दशावतार'च्या खेळासमोर लव्ह स्टोरी पडल्या फिक्या! 'बिन लग्नाची गोष्ट' - 'आरपार'ने पहिल्या दिवशी किती कमावले?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Movie Box Office Collection : दशावतार, आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट असे तीन सिनेमे 12 सप्टेंबरला रिलीज झालेत. तिन्ही सिनेमांनी पहिल्या दिवशी कलेक्शन केलं?
advertisement
1/8

[caption id="attachment_1479025" align="aligncenter" width="1200"] 12 सप्टेंबरला एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज करण्याचं धाडसं निर्मात्यांनी दाखवलं. दशावतार, आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट असे तीन सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले.</dd> <dd>[/caption]
advertisement
2/8
तिनही सिनेमांचे विषय वेगळे आहेत. मात्र एकाच दिवशी रिलीज झाल्याने नक्की कोणता सिनेमा पाहायचा असा प्रश्न प्रेक्षकांना पडला.
advertisement
3/8
यातही 'दशावतार' सिनेमासाठी प्रेक्षक सर्वाधिक उत्सुक असल्याचं दिसलं होतं. आता तिनही सिनेमे रिलीज झालेत. पहिल्या दिवशी कोणी किती कमाई केली पाहूयात.
advertisement
4/8
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'दशावतार' सिनेमानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. दशावतार सिनेमानं पहिल्या दिवशी 65 लाखांची कमाई केली आहे.
advertisement
5/8
तर 'दशावतारा'च्या खेळासमोर 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' काहीशा फिक्या पडताना दिसल्यात.
advertisement
6/8
'आरपार' या सिनेमानं पहिल्या दिवशी 13 लाखांची कमाई केली आहे. लव्ह स्टोरी, ड्रामा आणि रोमान्सने भरलेला हा सिनेमा आहे. हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यात प्रमुख भूमिकेत आहेत.
advertisement
7/8
तर नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक हे सगळं दाखवणारा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतील उतरतोय. सिनेमानं पहिल्या दिवशी फक्त 8 लाखांची कमाई करण्यात यश मिळवलं.
advertisement
8/8
येत्या विकेंडला या तिनही सिनेमांचं कलेक्शन वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिनही सिनेमांची कथा आणि त्यांचे जॉनर वेगळे आहेत. विकेंडला तिनही सिनेमे पाहण्यासाठी थिएटर ऑलमोस्ट फुल असल्याचं दिसतंय. विकेंडला कोण किती कमाई करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दशावतार'च्या खेळासमोर लव्ह स्टोरी पडल्या फिक्या! 'बिन लग्नाची गोष्ट' - 'आरपार'ने पहिल्या दिवशी किती कमावले?