Marathi Movie : ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये मराठी सिनेमाचा धमाका, दसऱ्याच्या मुहूर्तावर केली मोठी घोषणा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Movies Announcement Dussehra 2025 : दसरा आणि विजयादशमी हा विजय, आनंद आणि नव्या सुरुवातीचा सण मानला जातो. नव्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. यंदा हा दिवस मराठी चित्रपटसृष्टीसाठीही हा दिवस खास ठरला आहे. या दिवशी एकाचवेळी अनेक दमदार आणि बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
1/6

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'आली मोठी शहाणी' या नवीन चित्रपटाची घोषणा झाली. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. नोव्हेंबर 2025 पासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे.
advertisement
2/6
रावण कॉलिंग : दसऱ्याच्या निमित्ताने 'रावण कॉलिंग' या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. हा थ्रिलर-कॉमेडी चित्रपट आहे. 9 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा काय असणार हे अद्याप गलदस्त्यात ठेवण्यात आलंय.
advertisement
3/6
रणपति शिवराय – स्वारी आग्रा : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याच्या श्री शिवराज अष्टक संकल्पनेतील 'रणपति शिवराय – स्वारी आग्रा' हा सहाव्या चित्रपटाची दसऱ्याच्या दिवशी घोषणा करण्यात आली. 19 फेब्रुवारी 2026 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
advertisement
4/6
गोंधळ : हा नवा मराठी चित्रपट नोव्हेंबर 2025 मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी हे कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
advertisement
5/6
महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या दमदार चित्रपटाचीही घोषणा नवरात्रीत करण्यात आली. 31 ऑक्टोबर 2025 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला.
advertisement
6/6
चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रखर रूप पहिल्यांदात दिसणार आहे. मराठी अस्मिता, बळीराजाची वेदना, परप्रांतीय प्रश्न आणि मुंबईतील मराठी माणसांचा संघर्ष या विषयांवर हा भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Movie : ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये मराठी सिनेमाचा धमाका, दसऱ्याच्या मुहूर्तावर केली मोठी घोषणा