TRENDING:

हॉरर, कॉमेडी आणि अ‍ॅक्शन, 2026 गाजवणार या 8 फिल्म, तुम्ही कोणत्या पाहणार?

Last Updated:
Most Awaited Films of 2026 : सिनेप्रेक्षकांना 2026 मध्ये मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. थिएटरमध्ये 8 बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज होणार आहेत.
advertisement
1/7
हॉरर, कॉमेडी आणि अ‍ॅक्शन, 2026 गाजवणार या 8 फिल्म, तुम्ही कोणत्या पाहणार?
बॉलिवूडसाठी 2026 हे वर्ष खूप खास असणार आहे. दमदार कथा, रोमान्स, थरार, नाट्य अशा सर्व गोष्टीचं मिश्रण 2026 मध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांत पाहायला मिळणार आहे. नवीन वर्ष बॉलिवूडसाठी एखाद्या उत्सवासारखं असेल. जाणून घ्या 2026 मध्ये थिएटर गाजवणाऱ्या बहुप्रतीक्षित आठ चित्रपटांबद्दल.
advertisement
2/7
बॅटल ऑफ गलवान (Battle of Galwan) : 'बॅटल ऑफ गलवान' या हाय-वोल्टेड ड्रामा फिल्ममध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत आहे. देशभक्ति आणि अॅक्शनचं मित्रण असणारा हा चित्रपट 2026 च्या सर्वाधिक चर्चित चित्रपटांपैकी एक आहे.
advertisement
3/7
लव्ह अँड वॉर (Love And War) : संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात पहिल्यांदाच विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट झळकणार आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपटात एक लव्ह ट्रँगलदेखील पाहायला मिळेल. 15 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो.
advertisement
4/7
बॉर्डर 2 (Border 2) : 'बॉर्डर' या 1997 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा 'बॉर्डर 2' हा दुसरा भाग आहे. सनी देओल आणि वरुण धवन अभिनीत हा चित्रपट 23 जानेवारी 2026 मध्ये सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
advertisement
5/7
वध 2 (Vadh 2) : 'वध 2' या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. एक वेगळा विषय असणारा हा चित्रपट 9 डिसेंबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
advertisement
6/7
धमाल 4 (Dhamaal 4) : 'धमाल 4' हा विनोदी चित्रपट 2026 मध्ये प्रेक्षकांना चांगलच हसवणार आहे. या चित्रपटात अजय देवगन IRS अधिकारी होऊन एका भ्रष्ट अधिकाऱ्यासंबंधीत केसची चौकशी करताना दिसेल. धमाल, मजा, मस्ती असणारा हा सिनेमा आहे.
advertisement
7/7
भूत बंगला (Bhoot Bangla) : 'भूत बंगला' हा हॉरर जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, तब्बू आणि परेश रावल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. मायथोलॉजी, ब्लॅक मॅजिक असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करेल, अशी शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हॉरर, कॉमेडी आणि अ‍ॅक्शन, 2026 गाजवणार या 8 फिल्म, तुम्ही कोणत्या पाहणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल