TRENDING:

PM मोदींकडून मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट, वेळ वाचणार, CM फडणवीस यांनी दिली माहिती

Last Updated:

Mumbai: पंतप्रधान मोदी यांनी मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली असून त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. उरण मार्गावरील कमी लोकल फेऱ्यांमुळे गेल्या काही काळापासून प्रवाशांत नाराजी होती. बेलापूर–उरण लोकलसुद्धा जवळपास दीड–दीड तासांच्या अंतराने धावत असल्याने खोळंबा होत होता. मात्र आता या दोन्ही मार्गांवरील प्रवाशांना सर्वाधिक त्रास देणाऱ्या या समस्येवर कायमचा तोडगा निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
PM मोदींकडून मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट, वेळ वाचणार, CM फडणवीस यांनी दिली माहिती
PM मोदींकडून मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट, वेळ वाचणार, CM फडणवीस यांनी दिली माहिती
advertisement

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून नवी मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली. त्यांनी सांगितले की, नेरुळ–उरण मार्गावर 4 अतिरिक्त लोकल फेऱ्या आणि बेलापूर–उरण मार्गावर 6 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे दैनंदिन प्रवासातील मोठा ताण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेट्रोतून उतरून थेट लोकल पकडायची, मुंबईतील ही मेट्रो आता रेल्वे स्टेशनला जोडणार

advertisement

फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत सांगितले की, त्यांच्या निवेदना ला मान देत हा निर्णय करण्यात आला आहे, ज्यामुळे नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उरण मार्गावर लोकलच्या 50 फेऱ्या

सध्या उरण मार्गावर लोकल दीड तासांच्या अंतराने उपलब्ध होती. या मार्गावरील 10 नवीन फेऱ्यांमुळे आता एकूण लोकल सेवा 40 वरून 50 होणार आहेत. त्यामुळे गर्दी कमी होईल आणि गाड्यांचे अंतरही लक्षणीयरीत्या कमी होईल.

advertisement

दोन नवीन स्थानकांना मंजुरी

बेलापूर–उरण मार्गावर तारघर आणि गव्हाण ही दोन स्थानके अधिकृतरीत्या वापरासाठी तयार आहेत. तारघर स्टेशन हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्वात जवळ असल्याने विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. तसेच गव्हाण स्टेशनवर शौचालये, प्लॅटफॉर्म, तिकीट काउंटर आणि पार्किंगसह सर्व सुविधा पूर्ण केल्या आहेत. दोन्ही स्थानके सिडकोतर्फे उभारण्यात आली असून रेल्वे प्रशासनाने या महिन्यातच स्थानके आणि नवीन फेऱ्या सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

advertisement

मागील अडचणी आता सुटणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांदा आणि सोयाबीनच्या भावात पुन्हा चढ-उतार, मक्याला किती मिळाला आज भाव?
सर्व पहा

सीवूड–बेलापूर–उरण मार्गावर फक्त 5 अप आणि 5 डाउन लोकल असल्याने प्रवासी वाढूनही सुविधा वाढत नव्हत्या. या नव्या निर्णयामुळे दररोजचा ताण कमी होणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

मराठी बातम्या/मुंबई/
PM मोदींकडून मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट, वेळ वाचणार, CM फडणवीस यांनी दिली माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल