TRENDING:

'पुरूषासारखे मसल्स' म्हणणारी मृणाल बिपाशापेक्षा खूपच गरीब, Net Worth मधील फरक पाहून डोकं चक्रावेल

Last Updated:
Mrunal Thakur Bipasha Basu Net Worth Comparison : अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि बिपाशा बसू यांच्यात सोशल मीडियावर सुरू असलेल्या कोल्ड वॉरमुळे चर्चा रंगली आहे. अशातच दोन्ही अभिनेत्रींची संपत्ती किती आहे, याचाही खुलासा झाला आहे.
advertisement
1/8
'पुरूषासारखे मसल्स' म्हणणारी मृणाल ठाकूर आहे बिपाशापेक्षा खूपच गरीब
मुंबई: सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि बिपाशा बसू यांच्यात सोशल मीडियावर सुरू असलेला कोल्ड वॉर खूप चर्चेत आहे. सध्या मृणालचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने बिपाशाच्या शरीरावर टोमणा मारला होता.
advertisement
2/8
यावर आता बिपाशानेही सडेतोड उत्तर दिलं आहे. या 'तू-तू-मै-मै'मुळे दोन्ही अभिनेत्रींची चर्चा सुरू असताना, त्यांची संपत्ती किती आहे, याचाही खुलासा झाला आहे.
advertisement
3/8
टीव्हीवर 'कुमकुम भाग्य' सारखे हिट शो केल्यानंतर मृणाल ठाकूर चित्रपटांकडे वळली. तिने 'सुपर ३०', 'बाटला हाऊस' आणि 'सन ऑफ सरदार २' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
4/8
अभिनयाच्या जोरावर तिने अल्पावधीतच मोठी कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, मृणालची एकूण संपत्ती ३५ ते ४० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. मृणाल एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये मानधन घेते.
advertisement
5/8
तिची मासिक कमाई सुमारे ६० लाख रुपये आहे, तर वार्षिक कमाई ७ कोटी रुपयांच्या आसपास आहे. तिच्याकडेही टोयोटा फॉर्च्यूनर, होंडा अकॉर्ड आणि मर्सिडीज-बेंझ एस-क्लास यांसारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.
advertisement
6/8
'राज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी बिपाशा बसू लग्नानंतर अभिनयापासून दूर आहे. तिने अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं असून त्यांना एक मुलगी आहे.
advertisement
7/8
बिपाशा चित्रपटांमध्ये दिसत नसली, तरी ती आजही खूप आलिशान आयुष्य जगते. 'बॉलिवूड शादी'च्या एका रिपोर्टनुसार, बिपाशाची एकूण संपत्ती सुमारे ११३ कोटी रुपयांची आहे.
advertisement
8/8
बिपाशा आजही ब्रँड शूट्स आणि जाहिरातींमधून भरपूर पैसे कमावते. एका जाहिरातीसाठी ती २ कोटी रुपये घेते. मुंबईत तिचं एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे. तिच्याकडे ऑडी क्यू, टोयोटा फॉर्च्यूनर यांसारख्या अनेक महागड्या गाड्याही आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'पुरूषासारखे मसल्स' म्हणणारी मृणाल बिपाशापेक्षा खूपच गरीब, Net Worth मधील फरक पाहून डोकं चक्रावेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल