2 लग्नानंतर या अभिनेत्रीनं दत्तक घेतली अनाथ मुलगी; नवराही आहे मोठा स्टार!
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिने ९० च्या दशकात खूप प्रसिद्धी मिळवली होती. तसंच तिचं नाव अनेकांशी जोडलं गेलं. त्यातच तिचं लग्न झालं, तेही फार काळ टिकलं नाही. कोण होती ही अभिनेत्री जाणून घ्या.
advertisement
1/9

नीलम कोठारीचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. गुजराती कुटुंबात जन्मलेली नीलम आज 54 वर्षांची आहे. तिचं कुटुंब दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित होतं, नीलम आजही आपला हा व्यवसाय सांभाळते आहे. ती आज बॉलिवूडमधून दूर झाली असली तरी आपल्या व्यवसायात गुंतून आहे.
advertisement
2/9
नीलम कोठारीच्या कारकिर्दीची सुरुवात अतिशय मनोरंजक पद्धतीने झाली. झालं असं की नीलमचं कुटुंब बँकॉकला शिफ्ट झालं होतं. एके दिवशी नीलम तिच्या मैत्रिणींसोबत मुंबईत आली होती. तेव्हाच रमेश बहलनं तिला पाहिलं आणि तिला आपल्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर 1984 मध्ये नीलमने 'जवानी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली.
advertisement
3/9
नंतर नीलमने 'इलजाम', 'लव्ह 86', 'आग ही आग', 'सिंदूर', 'हत्या', 'वक्त की आवाज', 'घराना', 'दो कैदी', 'प्यार का कर्ज', 'अग्निपथ' केली. ', 'शहजादे', 'कसम पत्थर और पायल' आणि अनेक सिनेमांमध्ये काम केलं.
advertisement
4/9
नीलम कोठारीचं नाव गोविंदासोबत जोडलं गेलं. या अभिनेत्यानं नीलमसाठी सुनितासोबतच नातं तोडल्याचंही बोललं जातं. पण गोविंदाच्या आईमुळं हे नातं पुढे जाऊ शकलं नाही.
advertisement
5/9
नीलम कोठारीने 2000 मध्ये ऋषी सेठियाशी लग्न केलं. ऋषी सेठिया हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तो लंडनचा रहिवासी होता. नीलम आणि ऋषी सेठिया यांचा संसार केवळ 2 वर्षे टिकला.
advertisement
6/9
पहिल्या घटस्फोटानंतर नीलम कोठारीने अभिनेता समीर सोनीसोबत दुसरं लग्न केलं.
advertisement
7/9
पहिल्या घटस्फोटानंतर नीलम कोठारीने अभिनेता समीर सोनीसोबत दुसरं लग्न केलं. दोघेही 2007 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ही भेट झाली होती. यानंतर दोघे प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
advertisement
8/9
नीलमसोबतच समीर सोनीचंही हे दुसरं लग्न होतं.
advertisement
9/9
नीलम कोठारी आणि समीर सोनी यांनी स्वतःच्या मुलाला जन्म न देता एक मुलगी दत्तक घेतली. या मुलीचं नाव अहाना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 लग्नानंतर या अभिनेत्रीनं दत्तक घेतली अनाथ मुलगी; नवराही आहे मोठा स्टार!