ना शाहरुखची लाडकी लेक, ना जुही चावला; IPL 2026 च्या लिलावात 'KKR गर्ल'चा जलवा! कोण आहे ती?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
IPL 2026 Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या १९व्या सिझनच्या लिलावात जगभरातील खेळाडूंवर कोटींची बोली लागत असताना, एका तरुण चेहऱ्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
1/8

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या १९व्या सिझनचा मिनी-लिलाव सध्या अबु धाबीमध्ये सुरू आहे. या लिलावात जगभरातील खेळाडूंवर कोटींची बोली लागत असताना, एका तरुण चेहऱ्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
2/8
हा चेहरा आहे 'KKR गर्ल' म्हणून लोकप्रिय असलेली जान्हवी मेहताचा! ती पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या टेबलावर बोली लावणाऱ्या टीम ऑफिशियल्ससोबत बसलेली दिसली.
advertisement
3/8
आयपीएलच्या या लिलावात १० संघ मिळून ७७ खेळाडूंच्या जागा भरत आहेत, ज्यासाठी ते एकूण २३७.५५ कोटी रुपयांची मोठी रक्कम घेऊन मैदानात उतरले आहेत.
advertisement
4/8
जान्हवी मेहता ही बॉलिवूडची एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला आणि उद्योगपती जय मेहता यांची मुलगी आहे. जुही चावला आणि जय मेहता हे दोघे KKR फ्रँचायझीचे सह-मालक आहेत.
advertisement
5/8
जान्हवीच्या चेहऱ्यावर तिच्या आईची म्हणजेच जुही चावलाची स्पष्ट झलक दिसते. २०२० मध्ये पहिल्यांदा ती आयपीएल लिलावात दिसली आणि तेव्हापासून ती 'KKR गर्ल' म्हणून लोकप्रिय झाली. लिलावाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याबद्दल आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिकेबद्दल तिचे खूप कौतुक होत आहे.
advertisement
6/8
जान्हवी मेहता केवळ सेलिब्रिटी किड नाही, तर ती उच्चशिक्षित आहे. तिने कोलंबिया विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, ती नेहमी मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहते आणि सध्या संपूर्ण लक्ष वडिलांच्या 'मेहता ग्रुप' च्या व्यवसाय जबाबदाऱ्यांवर केंद्रित करत आहे.
advertisement
7/8
जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता एका मोठ्या आर्थिक साम्राज्याची वारसदार आहे. हुरून इंडियाच्या 'रिच लिस्ट २०२४' नुसार, जुही चावलाचा समावेश टॉप २० श्रीमंत भारतीयांमध्ये करण्यात आला आहे.
advertisement
8/8
या अहवालानुसार, जुही चावलाची एकूण संपत्ती सुमारे ४,६०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यातील मोठा हिस्सा मेहता ग्रुपच्या मालमत्तेमुळे आहे. या प्रचंड संपत्तीची वारसदार म्हणून जान्हवी मेहता आता व्यवसाय जगतात दमदार पाऊल टाकत आहे. आयपीएल लिलावासारख्या मोठ्या व्यावसायिक व्यासपीठावर तिची सक्रिय उपस्थिती, ही तिच्या करिअरमधील एक भाग समजला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना शाहरुखची लाडकी लेक, ना जुही चावला; IPL 2026 च्या लिलावात 'KKR गर्ल'चा जलवा! कोण आहे ती?