TRENDING:

2 तास 37 मिनिटांची ही हिंदी मूव्ही, Netflix वर रिलीज होताच करतेय पहिल्या क्रमांकावर ट्रेंड

Last Updated:
Netflix New Releases : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच एक चित्रपट रिलीज झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाने 170 कोटींची कमाई करत नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकाच स्थान मिळवलं आहे.
advertisement
1/7
2 तास 37 मिनिटांची ही हिंदी मूव्ही, Netflix वर रिलीज होताच करतेय ट्रेंड
नेटफ्लिक्सवर प्रत्येक आठवड्यात अनेक नवे चित्रपट आणि सीरिज रिलीज होत असतात. OTT वर सध्या बॉलिवूडच्या एका सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. आपल्या दमदार कथानकाने या सिनेमाने प्रत्येकाला वेड लावलं आहे.
advertisement
2/7
14 नोव्हेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असंख्य चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज झाले. यातीच एका बॉलिवूडपटाने रिलीज होताच नेटफ्लिक्सवरील ट्रेडिंग चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
advertisement
3/7
ओटीटीवर रिलीज झालेला हा हिंदी चित्रपट सप्टेंबर महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता ओटीटीवर येताच हा सिनेमा मस्ट वॉच झालेला आहे. घरबसल्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. नेटफ्लिक्सवरील या चित्रपटात एक गंभीर विषय मांडण्यात आला आहे.
advertisement
4/7
ओटीटीवर रिलीज झालेला हा चित्रपट मधूनमधून तुम्हाला हसायलाही भाग पाडतो. देशातील शेतकऱ्यांच्या शोषणाची कथा या चित्रपटात मांडली आहे. कोर्टरूममध्ये दोन वकिलांमधील तणाव या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
advertisement
5/7
एक वकील शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहतो आणि दुसरा वकील एका प्रसिद्ध व्यावसायिकाचं समर्थन करतो. पण शेवटी कथानकात असं वळण येतं की दोन्ही वकील त्याच व्यावसायिकाच्या विरोधात उभे राहतात.
advertisement
6/7
अक्षय कुमार आणि अरशद वारसी स्टारर 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. थिएटरमध्ये धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
7/7
'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली होती. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3'ने देशात 113 कोटी आणि जगभरात 170 कोटींचा गल्ला जमवला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 तास 37 मिनिटांची ही हिंदी मूव्ही, Netflix वर रिलीज होताच करतेय पहिल्या क्रमांकावर ट्रेंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल