गौरव शिंगाडे हा मुळचा मोहोळ तालुक्याती सारोळे येथील शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे कुटुंब परंपरागत शेती करते. सध्या राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ येथे तो बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने वडिलांची साथ आणि सल्ला घेऊन शेती सुरू केली. आपल्या पाऊण एकर शेतात झेंडूची लागवड केली.
तरुण शेतकऱ्याने तीन एकरात फुलवली गुलछडीची शेती, शेतीतून महिन्याकाठी कमावतो लाखो रूपये
advertisement
कशी केली शेती?
गौरवने झेंडूच्या फुलाची लागवड करण्या अगोदर जमिनीची मशागत करून घेतली. त्यानंतर मल्चिंग पेपर टाकून एका फुटावर झेंडूच्या रोपांची लागवड केली. झेंडूच्या फुलावर करपा, बुरशी, अळी हा रोग पडू नये म्हणून काळजी घेतली. त्यासाठी आठवड्यातून एकदा रविवारी कॉलेजला सुट्टी असताना झेंडूच्या फुलांवर फवारणी केली. लागवडीपासून त्याला जवळपास 80 ते 90 हजार रुपयांचा खर्च आला. आतापर्यंत 10 तोडे झाले असून झेंडू विक्रीतून गौरवला 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
50 रुपये किलो भाव
सध्या झेंडूच्या फुलाला 50 रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. गौरव झेंडू फुलाची तोडणी करून मुंबई येथील दादर मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत आहे. शिक्षण घेत शेती करत गौरवने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ज्यामुळे उच्चशिक्षित किंवा शिक्षण घेत असलेल्या तरुणांमध्ये शेती संदर्भात नवी ऊर्जा आणि संधी निर्माण होईल, हे मात्र नक्की.





