तरुण शेतकऱ्याने तीन एकरात फुलवली गुलछडीची शेती, शेतीतून महिन्याकाठी कमावतो लाखो रूपये
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणारा 29 वर्षे तरुण राहुल घागरे यांनी तीन महिन्यापूर्वी तीन एकर मध्ये गुलछडीची लागवड केली होती. यासाठी त्यांना जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणारा 29 वर्षे तरुण राहुल घागरे यांनी तीन महिन्यापूर्वी तीन एकर मध्ये गुलछडीची लागवड केली होती. यासाठी त्यांना जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर पहिल्यांदाच लागवड केलेल्या गुडछडीपासून तीन वर्ष उत्पन्न राहुल घागरे यांना मिळणार असून वर्षाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न राहुल घागरे गुलछडी विक्रीतून घेत आहे. या संदर्भात अधिक माहिती तरुण शेतकरी राहुल घागरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
पापरी गावात राहणाऱ्या राहुल घागरे यांनी तीन एकरमध्ये गुलछडीची लागवड केली आहे. जमिनीची मशागत करून गुलछडी बियाण्याची खरेदी करून तीन एकरामध्ये लागवड केली आहे. गुलछडीची लागवड करून तीन महिने झाले असून व्यवस्थित रित्या खतपाणी आणि गुलछडीवर रोग पडू नये यासाठी योग्य ती फवारणी करून पहिल्यांदाच राहुल यांनी गुलछडीची लागवड केली आहे. एकदा गुलछडीची लागवड केल्यावर जवळपास तीन वर्ष यापासून उत्पन्न राहुल घागरे यांना मिळणार आहे.
advertisement
दररोज आता 40 ते 50 किलो गुलछडी विक्रीसाठी राहुल घागरे हे मुंबईला पाठवत आहे. तर आणखीन पाच सहा महिन्यानंतर याच गुलछडीपासून राहुल घागरे यांना दररोज 80 ते 100 किलो गुलछडी विक्रीसाठी मिळणार आहे. तर या गुलछडी विक्रीपासून खर्च वजा करून वर्षाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न राहुल यांना मिळणार आहे. सध्या राहुल मोहोळ तालुक्यातून गुलछडी विक्रीसाठी मुंबई येथील दादर मध्ये असलेल्या फुल मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत आहे. सध्या गुलछडीला 100 ते 120 रुपये किलो दराने भाव 100 ते 120 रुपये किलो दराने भाव मिळत आहे.
advertisement
सणासुदीच्या काळात याच गुलछडीला 800 ते 1 हजार रुपये किलो दर मिळतो. तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे लक्ष द्यावे, नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न शेतीतून मिळेल असा सल्ला तरुण शेतकरी राहुल घागरे यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 17, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तरुण शेतकऱ्याने तीन एकरात फुलवली गुलछडीची शेती, शेतीतून महिन्याकाठी कमावतो लाखो रूपये

