ShaniDev: तुमच्या राशीनुसार तुमची साडेसाती..! शनिचा फेरा मेष ते मीन 12 राशींवर कधी येणार?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ShaniDev Astrology : शनिला नवग्रहांमध्ये विशेष स्थान आहे. संतगती चालणार शनी ग्रह लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतो. शनिची साडेसाती म्हटलं की अनेकांना भीती वाटते, साडेसाती हा शब्दच वाईट गोष्टी या अर्थानं वापरला जातो. पण काहीही झालं तरी आयुष्यात साडेसातीला तोंड द्यावं लागतं. शनिदेव हळुहळु चालत आपल्या दाराशी साडेसाती घेऊन येतातच, खरंतर अनेक ज्योतिषतज्ज्ञांच्या मते साडेसाती हा चांगला काळ मानावा असं सांगितलं जातं. साडेसाती काळात माणसाला आयुष्याचे धडे मिळतात. शनिची साडेसाती कोणत्या राशींना कधी असेल, याविषयी नाशिकच्या ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊ
advertisement
1/12

मेष रास - मेष राशीची साडेसाती याच वर्षी 29 मार्च 2025 रोजी सुरू झाली असून ती 31 मे 2032 पर्यंत असेल. अद्याप भरपूर काळ या राशीच्या लोकांना विविध गोष्टी पाहाव्या अन् सोसाव्या लागणार आहेत.
advertisement
2/12
वृषभ रास - आता लवकरच ज्या राशींची साडेसाती सुरू होणार आहे, त्यामध्ये या राशीचा नंबर लागणार आहे. वृषभ राशीची साडेसाती 3 जून 2027 ते 13 जुलै 2034 या काळात असेल.
advertisement
3/12
मिथुन रास - मिथुन राशीचाही लवकरच नंबर लागणार असून या राशीची साडेसाती 08 ऑगस्ट 2029 ते 27 ऑगस्ट 2036 पर्यंत असेल.
advertisement
4/12
कर्क रास - कर्क राशीची साडेसाती देखील लांब नाही. 31 मे 2032 ते 22 ऑक्टोबर 2038 हा साडेसातीचा काळ असेल.
advertisement
5/12
सिंह रास - पाचव्या नंबरची रास असलेल्या सिंह राशीची साडेसाती 13 जुलै 2034 ते 29 जानेवारी 2041 या काळात असणार आहे.
advertisement
6/12
कन्या रास - त्यानंतर कन्या राशीचा नंबर लागेल. कन्या राशीची साडेसाती 27 ऑगस्ट 2036 ते 12 डिसेंबर 2043 पर्यंत असेल.
advertisement
7/12
तूळ रास - तूळ राशीच्या लोकांना कन्या राशिनंतर साडेसातीचा टप्पा सुरू होईल. या राशीच्या लोकांना 22 ऑक्टोबर 2038 ते 8 डिसेंबर 2046 पर्यंत साडेसातीचा त्रास सोसावा लागेल.
advertisement
8/12
वृश्चिक रास - काहीच वर्षांपूर्वी या राशीवरील साडेसाती संपल्यामुळे त्यांना आता 28 जानेवारी 2041 ते 3 डिसेंबर 2049 या काळात साडेसातीचा मार सोसावा लागेल.
advertisement
9/12
धनु - धनु राशीची साडेसाती सध्या खूप लांब आहे. 11 डिसेंबर 2043 ते 24 फेब्रुवारी 2052 या काळात साडेसातीची झळ बसणार आहे.
advertisement
10/12
मकर - मकर राशीचे लोक आत्ताच साडेसाती सोसून रिकामे झाले आहेत. 26 जानेवारी 2017 ते 29 मार्च 2025 या काळात मकर राशिवर साडेसाती होती.
advertisement
11/12
कुंभ रास - साडेसाती भोगत असलेल्या राशीच्या पैकी एक असलेली कुंभ रास. या राशीवर साडेसाती सुरू होऊन पाच वर्ष होत आहेत. 24 जानेवारी 2020 ते 3 जून 2027.. म्हणजे कुंभ राशीची साडेसाती संपेल आणि वृषभ राशीची सुरू होईल.
advertisement
12/12
मीन - साडेसातीचा दुसरा टप्पा खडतर मानला जातो, तो मीन राशिवर सुरू आहे. 29 एप्रिल 2022 ला सुरू झालेली साडेसाती 8 ऑगस्ट 2029 या वर्षी संपेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: तुमच्या राशीनुसार तुमची साडेसाती..! शनिचा फेरा मेष ते मीन 12 राशींवर कधी येणार?