असह्य वेदनांना कंटाळली शर्लिन चोप्रा, सर्जरीनंतर थेट हातातच घेऊन आली हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sherlyn Chopra : अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा गेल्या काही दिवसांपासून आपल्या आरोग्यविषयक समस्यांपासून चर्चेत आहे. शर्लिन चोप्राने अखेर आता आपले हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले आहेत.
advertisement
1/7

1. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शर्लिनने भयंकर त्रास होत असल्याने हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकणार असल्याचं सांगितलं होतं. पण आता शर्लिनने तिचे हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
advertisement
2/7
शर्लिनला काही दिवसांपासून पाठ, छाती आणि मानदुखीचा भयंकर त्रास होत होता. आता तिने हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले आहेत. नुकतीच तिची शस्त्रक्रिया पार पडली असून अभिनेत्री सुखरुप आहे.
advertisement
3/7
शर्लिनने सिलिकॉन इम्प्लांटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सिलिकॉन इम्प्लांट 825 ग्रॅमचे आहेत. अभिनेत्रीने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"सिलिकॉन-फ्री! आता खूप हलकं वाटतंय. माझ्यासारखी चूक पुन्हा कोणी करू नका".
advertisement
4/7
शर्लिनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"माझा ठाम विश्वास आहे की अनावश्यक ओझं घेऊन जगण्यात काही अर्थ नाही. ही माझी वैयक्तिक मते आहेत. प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. माझी ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी केलेल्या डॉक्टरांच्या टीमचे मनःपूर्वक आभार".
advertisement
5/7
शर्लिनच्या छातीवर दाब आल्याने स्नायूंवर ताण येत होता. त्यामुळे काही दिवसांपासून शर्लिनचं आयुष्य कठिण झालं होतं. आता शर्लिनच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
advertisement
6/7
शस्त्रक्रियेनंतर शर्लिन आता आपल्या प्रकृतीची काळजी घेत आहे. आपल्या आयुष्यासंबंधित प्रत्येक अपडेट शर्लिन सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.
advertisement
7/7
शर्लिन चोप्रा ही भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडल आहे. हिंदी, तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये शर्लिनने काम केलं आहे. तिने 2007 मध्ये 'रेड स्वस्तिक' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. 'बिग बॉस' या लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमातही शर्लिन 2009 मध्ये सहभागी झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
असह्य वेदनांना कंटाळली शर्लिन चोप्रा, सर्जरीनंतर थेट हातातच घेऊन आली हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट PHOTO