TRENDING:

Marathi Natak : यंदाची दीपावली खास! सुरेल दिवाळी पहाटनंतर नाटकांची मेजवानी, ही घ्या लिस्ट

Last Updated:
Marathi Natak : विजयादशमीचा मुहूर्त साधत नवीन नाटकांची घोषणा करण्याची परंपरा मराठी व्यावसायिक रंगभूमीने यंदाही जपली आहे. दसऱ्याचे औचित्य साधत सहा नव्या नाटकांची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
1/7
यंदाची दीपावली खास! सुरेल दिवाळी पहाटनंतर नाटकांची मेजवानी, ही घ्या लिस्ट
Mar चिरंजीव परफेक्ट बिघडलाय : चंद्रकांत कुलकर्णी यांचं 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय' हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहेत. विनोद रत्ना यांनी नाटकाचं लेखन केलं आहे. नव्या पिढीचे, नव्या युगाचे असं हे नाटकं आहे.
advertisement
2/7
कुणीतरी आहे तिथं : अश्वमी थिएटर्स निर्मित आणि अद्वैत थिएटर्स प्रकाशित 'कुणीतरी आहे तिथ' हे नाटक दिवाळी पाडव्याला रंगभूमीवर येणार आहे. महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेल्या या नाटकाचं लेखन सुरेश खरे यांनी केलं आहे. तर नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहोनी आहेत. नाटकात कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्यात ठेवण्यात आलं आहे.
advertisement
3/7
करुणाष्टके : प्रसाद कांबळी यांचं भद्रकाली प्रोडक्शन 'करुणाष्टके' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलं आहे. 'उंबरठचा पलीकडची गोष्ट' अशी नाटकाची टॅगलाइन आहे. या नाटकात अभिनेत्री पर्ण पेठे आणि गीतांजली कुलकर्णी यांच्यासोबत कल्याणी मुळे, केतकी सराफ, माधुरी भारती, किरण खोजे, प्रतीक्षा खासनीस, विनायक चव्हाण हे कलाकार आहेत. प्राजक्त देशमुखनं या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. यंदाच्या दिवाळीत नाटक सुरू होणार आहे.
advertisement
4/7
एक नातं असंही : विस्मय कासारांचं लेखन असलेलं 'एक नातं असंही' नवं मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचं दिग्दर्शन दर्शन घोलप यांनी केलं आहे. या नाटकात मृण्मयी सुमन, विस्मय कासार, प्रयीण भाबल, मोहिनी, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सृजल दळवी हे कलाकार आहेत.
advertisement
5/7
2nd इनिंग्ज : विनय आपटे यांच्या स्मृर्तीस अभिवादन करून 2nd इनिंग्ज हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन संजय मोने यांनी केलं आहे.
advertisement
6/7
हिमालयाची सावली हे नाटकंही पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं आहे.
advertisement
7/7
50 वर्षांआधी वादग्रस्त ठरलेलं सखाराम बाइंडर हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे 22 वर्षांनी पुन्हा एकदा या नाटकात काम करत आहेत. या नाटकाचे प्रयोग देखील सुरू झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Natak : यंदाची दीपावली खास! सुरेल दिवाळी पहाटनंतर नाटकांची मेजवानी, ही घ्या लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल