आता भूकंप येणार! BIGG BOSS ला आवाज देणारा चेहरा 'शो'मध्ये! Wild Card Entry करणारा तो स्पर्धक कोण?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Updates : बिग बॉसच्या घरात नव्या स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. स्पर्धक म्हणून आलेला हा चेहऱ्याने, यापूर्वी दुसऱ्या भाषेतील बिग बॉसला आवाज दिला आहे.
advertisement
1/7

मुंबई : 'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोने जगभरात धुमाकूळ घातला आहे. हिंदी, मराठी कन्नड, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या तमिळमध्ये 'बिग बॉस ९' सुरू आहे आणि या सिझनमध्ये एका अत्यंत मनोरंजक आणि अनपेक्षित गोष्टीचा खुलासा झाला आहे.
advertisement
2/7
तमिळ बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आलेल्या या चेहऱ्याने, यापूर्वी दुसऱ्या भाषेतील बिग बॉसला आवाज दिला आहे. हा स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून, नुकताच वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन घरात दाखल झालेला अभिनेता अमित भार्गव आहे.
advertisement
3/7
अमित भार्गवने यापूर्वी कन्नड बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनला व्हॉईसओव्हर दिला होता. ज्या व्यक्तीच्या आवाजाने कन्नड शोच्या स्पर्धकांना आदेश दिले, तोच व्यक्ती आता तमिळ शोमध्ये स्वतः स्पर्धक बनला आहे. हे कनेक्शन खरंच चाहत्यांसाठी खूपच शॉकिंग ठरले आहे.
advertisement
4/7
अमित भार्गव हा तमिळ टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती विजय टीव्हीवरील 'कल्यानम मुधल कादल वरई' या मालिकेतून. यामध्ये त्याने प्रिया भवानी शंकरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर त्याने छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि तो प्रेक्षकांमध्ये चांगलाच पॉप्युलर झाला.
advertisement
5/7
तमिळ 'बिग बॉस ९' चा सिझन सध्या ५० व्या दिवसात पोहोचला आहे. अनेक स्पर्धकांच्या निरर्थक भांडणांमुळे नेटिझन्सनी या सिझनवर टीका केली होती. खुद्द होस्ट विजय सेतुपतीनेही दर आठवड्याला स्पर्धकांना त्यांच्या खेळाची दिशा बदलण्याचे सल्ले दिले होते.
advertisement
6/7
खेळाची गती वाढवण्यासाठी निर्मात्यांनी ५० व्या दिवसाच्या आसपास अमित भार्गव, सांड्रा, प्रजन आणि दिव्या यांसारख्या ४ स्पर्धकांना वाईल्ड कार्डद्वारे घरात पाठवले. यासोबतच, मंजरी, दीपक आणि प्रियांका यांनाही घरात आणले गेले आहे.
advertisement
7/7
आता या नव्या स्पर्धकांमुळे, विशेषत: दुसऱ्या 'बिग बॉस'चा आवाज असलेल्या अमित भार्गवमुळे, घरात काही बदल होतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आता भूकंप येणार! BIGG BOSS ला आवाज देणारा चेहरा 'शो'मध्ये! Wild Card Entry करणारा तो स्पर्धक कोण?