Nikki Tamboli Birthday : बिग बॉसच्या घरात निक्कीचं बर्थडे सेलिब्रेशन! अरबाजकडून मिळालं स्पेशल गिफ्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री निक्की तांबोळीचं बर्थ डे सेलिब्रेशन बिग बॉसच्या घरात सेलिब्रेट झाला. निक्कीला अरबाजकडून काय गिफ्ट मिळालं आहे पाहा.
advertisement
1/7

अभिनेत्री आणि मॉडेल निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरात आहे. घरात पहिल्या दिवसापासून निक्की धिंगाणा घालतेय.
advertisement
2/7
पहिले तीन आठवडे निक्कीचा आवाज चांगलाच वाढला होता. पण चौथ्या आठवड्यात निक्की घरातील सगळ्या सदस्यांबरोबर मिळून मिसळून वागताना दिसत आहे.
advertisement
3/7
बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. 21 ऑगस्ट रोजी निक्कीचा वाढदिवस होता. बिग बॉसच्या 23 ऑगस्टच्या भागात निक्कीचं बर्थडे सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे.
advertisement
4/7
बिग बॉसनी निक्कीसाठी खास बर्थडे केक पाठवला. निक्कीनं घरातील सगळ्या सदस्यांबरोबर केक कटिंग केलं.
advertisement
5/7
निक्कीचा बर्थडे आणखी स्पेशल करण्यासाठी सगळ्या सदस्यांनी तिला सकाळी उठून खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. निक्कीनं सगळ्यांचे आभार मानले.
advertisement
6/7
बिग बॉसच्या घरात निक्कीला बर्थडेचं खास गिफ्ट अरबाजकडून मिळालं आहे. निक्की पाचव्या आठवड्यात घराची कॅप्टन झाली आहे.
advertisement
7/7
पाचव्या आठवड्याचा कॅप्टन अरबाज झाला होता. मात्र त्यानं दोन दिवसात एका टास्क दरम्यान निक्कीला कॅप्टन्सी बर्थडे गिफ्ट म्हणून दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nikki Tamboli Birthday : बिग बॉसच्या घरात निक्कीचं बर्थडे सेलिब्रेशन! अरबाजकडून मिळालं स्पेशल गिफ्ट