निक्की तांबोळीच्या डोळ्याला काय झालं? अरबाज चिंतेत, दिली हेल्थ अपडेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Nikki Tamboli Eye Injury : अभिनेत्री निक्की तांबोळीच्या डोळ्याला काय झालं आहे याविषयी तिच्या चााहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. अखेर अरबाजने समोर येत सगळं सांगितलं.
advertisement
1/7

मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेत्री निक्की तांबोळी हिच्या तब्येतीबाबत चर्चा सुरू होती. नुकतंच निक्की डाव्या डोळ्याला पट्टी लावलेल्या अवस्थेत हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली होती. तिच्या डोळ्याला नेमकं काय झालं आहे, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती.
advertisement
2/7
सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. अखेर या सगळ्या चर्चांवर निक्कीचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अरबाज पटेल याने व्हिडीओ शेअर करत स्पष्ट माहिती दिली आहे.
advertisement
3/7
अरबाज पटेलने सांगितलं की, "मी सगळ्यांचे मेसेज पाहिले. मी निक्किलाही सांगितलं की लोक तुझ्याविषयी चिंता करत आहेत. सगळे विचारत आहेत की निक्कीच्या डोळ्याला काय झालं आहे. तर तिच्या डोळ्याला एक छोटी गाठ आली होती. ही गाठ डोळ्याच्या वरच्या बाजूला येते आणि ती इन्फेक्शनमुळे होते."
advertisement
4/7
अरबाजने पुढे सांगितलं, "आम्ही ते ऑपरेट केलं असून आता सगळं ठीक आहे. आता फक्त बरे होण्यासाठी दोन दिवस लागतील. सध्या तिच्या डोळ्याला पट्टी लावलेली आहे."
advertisement
5/7
चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दलही अरबाजने आभार मानले. अरबाज म्हणाला, "तुमचं प्रेम आणि काळजी पाहून खूप बरं वाटलं. निक्की आता पूर्णपणे बरी आहे. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद तिच्यासोबत आहेत आणि कायम राहतील. टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही".
advertisement
6/7
अरबाज पुढे म्हणला, "दोन दिवसांत निक्की इन्स्टाग्रामवर येईल आणि स्वतः स्टोरी टाकून तुम्हाला सगळं सांगेल. त्यामुळे कुणीही काळजी करू नका".
advertisement
7/7
अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी दोघेही बिग बॉस मराठी 5 मध्ये एकत्र सहभागी झाले होते. शोदरम्यान आणि त्यानंतरही दोघांची जोडी प्रचंड चर्चेत राहिली आहे. घराबाहेर पडल्यानंतरही निक्की आणि अरबाज एकत्र आहेत. अरबाज नेहमीच निक्कीची काळजी घेताना दिसतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
निक्की तांबोळीच्या डोळ्याला काय झालं? अरबाज चिंतेत, दिली हेल्थ अपडेट