डोक्याला दुखापत असतानाही कॉन्सर्टला गेली, 24 तासानंतर नोरा फतेहीची अशी अवस्था
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Nora Fatehi : नोरा फतेहीचा मुंबईतील अंधेरी भागात भयंकर कार अपघात झाला आहे. आता अभिनेत्रीने हेल्थ अपडेट शेअर केलं आहे.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिचा 20 डिसेंबर 2025 च्या रात्री मुंबईतील अंधेरी भागात मोठा अपघात झाला आहे. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने तिच्या कारला धडक दिली आहे. नोरा Sunburn फेस्टिव्हलला जात असताना हा अपघात घडला आहे.
advertisement
2/7
कारला धडक दिल्याने नोरा फतेहीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे अभिनेत्रीच्या टीमने लगेचच तिला रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं. डॉक्टरांनी नोराला आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण हाती घेतलेलं काम लक्षात घेतला ती कॉन्सर्टसाठी रवाना झाली.
advertisement
3/7
नोरा फतेहीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशेत गाडी चाववणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच नशेत गाडी चावल्याबद्दल त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
advertisement
4/7
नोरा फतेहीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आता हेल्थ अपडेट दिली आहे. या व्हिडीओमध्ये नोरा म्हणतेय,"माझी प्रकृती पूर्णपणे स्थिर असून तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एका नशेत असलेल्या व्यक्तीने माझ्या कारला धडक दिली होती. त्यामुळे माझं डोकं खिडकीला आपटलं आणि मला गंभीर दुखापत झाली".
advertisement
5/7
नोरा हेल्थ अपडेट देत पुढे म्हणतेय,"माझी माझी प्रकृती स्थिर असून अजूनही थोडी सूज आहे. थोडा त्रास होत आहे. खूप वाईट घडलं असतं. पण देवाचे आभार. त्याने मला वाचवलं. कोणत्याही प्रकारचं व्यसन, ड्रग्ज या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. दारूच्या नशेत गाडी चालवणं चुकीचं आहे. 2025 मध्येही अशा गोष्टी घडत आहेत यावर विश्वास बसत नाही. माझ्यासाठी ही खूप भयावह गोष्ट होती. अजूनही मी त्या धक्क्यात आहे".
advertisement
6/7
नोरा फतेही अपघातानंतर कॉन्सर्टसाठी रवाना होण्याबद्दल म्हणाली,"मी माझ्या कामाचा नेहमीच आदर करते. मिळालेल्या संधीकडे दुर्लक्ष करायला मला आवडत नाही. कारण आजवर या गोष्टीसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे नशेतल्या ड्रायव्हरमुळे मी मिळालेल्या संधीचा त्याग करू शकत नाही".
advertisement
7/7
नोरा फतेहीचा अपघात झाल्याने चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांचेही आभार मानले. नोरा म्हणाली,"माझी चाहत्यांनी मला खूप मेसेज केले आहेत. कृपया कोणीही नशा करुन गाडी चालवू नये".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डोक्याला दुखापत असतानाही कॉन्सर्टला गेली, 24 तासानंतर नोरा फतेहीची अशी अवस्था