TRENDING:

Dharmendra: 'एक-एक करून सगळे मला सोडून गेले', धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दुःखात बुडाली दिग्गज अभिनेत्री, फुटला अश्रूंचा बांध

Last Updated:
Dharmendra Passed Away: ६० आणि ७० च्या दशकात धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्या अतिशय भावुक झाल्या आहेत.
advertisement
1/7
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दुःखात बुडाली दिग्गज अभिनेत्री, फुटला अश्रूंचा बांध
मुंबई: बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. ६० आणि ७० च्या दशकात त्यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या आणि धर्मेंद्र यांच्यातील मैत्रीचे नाते पडद्यामागेही तितकेच जिव्हाळ्याचे होते.
advertisement
2/7
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आशा पारेख यांनी व्यक्त केलेल्या भावनांनी त्यांच्या चाहत्यांनाही भावूक केले आहे. त्यांनी म्हटले, "एक-एक करून माझे सर्व सहकलाकार सोडून गेले. आता तर धरमजीही गेले!" त्यांच्या या विधानातून केवळ दु:खच नाही, तर एका सुवर्ण युगाचा अंत होत असल्याची भावनाही दिसून येते.
advertisement
3/7
पारेख यांनी नेहमीच धर्मेंद्र यांना केवळ सहकलाकार नव्हे, तर एक जिवलग मित्र मानले. त्या म्हणतात की, "धर्मेंद्र यांचा वारसा अमर आहे आणि त्यांच्यासोबत काम करणे नेहमीच आनंदाची गोष्ट होती."
advertisement
4/7
आशा पारेख आणि धर्मेंद्र यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, ज्यांची आजही आठवण काढली जाते. त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. या जोडीने 'आये दिन बहार के' (१९६६), 'शिकार' (१९६८), 'मेरा गांव मेरा देश' (१९७१) आणि 'समाधी' (१९७२) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचे चित्रपट रोमाँस, ड्रामा आणि संगीताचा जबरदस्त संगम होता.
advertisement
5/7
आशा पारेख यांनी धर्मेंद्र यांच्यातील मनमिळाऊ स्वभाव आणि विनोदबुद्धीच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यांनी सांगितलं, "मी नेहमीच मस्तीखोर होते आणि धरमजीही तसेच होते. पण कॅमेरा सुरू होताच आम्ही एकदम गंभीर व्हायचो. ते कॅमेऱ्यासमोर खूप नैसर्गिक असायचे."
advertisement
6/7
सुपरस्टार असूनही धर्मेंद्र यांनी नेहमीच सेटवरील प्रत्येक टेक्निशिअनशी आदराने वागले, हे आशा पारेख यांनी आवर्जून सांगितले. 'फूल और पत्थर'नंतर त्यांना 'ही-मॅन' ही ओळख मिळाली, पण तरीही त्यांचा नम्रपणा कधीच कमी झाला नाही.
advertisement
7/7
ऋषिकेश मुखर्जींच्या 'सत्यकाम'मधील धर्मेंद्र यांचा अभिनय त्यांना खूप आवडल्याचेही त्यांनी सांगितले. 'चुपके चुपके' मध्येही त्यांच्यासोबत काम करण्याची त्यांची इच्छा होती, पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. आशा पारेख यांच्या या आठवणीतून धर्मेंद्र यांच्या मोठेपणाची आणि त्यांच्या निखळ मैत्रीची प्रचिती येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra: 'एक-एक करून सगळे मला सोडून गेले', धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दुःखात बुडाली दिग्गज अभिनेत्री, फुटला अश्रूंचा बांध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल