OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Movie: आजकालच्या प्रत्येक सिनेमांमध्ये बरेच बोल्ड आणि इंटीमेट सीन्स असतात. जे शक्यतो फॅमिलीसोबत बसून पाहू शकत नाही. त्यामुळे आज ज्या सिनेमाविषयी सांगणार आहोत तो तुम्ही कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही.
advertisement
1/7

आजकालच्या प्रत्येक सिनेमांमध्ये बरेच बोल्ड आणि इंटीमेट सीन्स असतात. जे शक्यतो फॅमिलीसोबत बसून पाहू शकत नाही. त्यामुळे आज ज्या सिनेमाविषयी सांगणार आहोत तो तुम्ही कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही. त्यामुळे जर हा सिनेमा पाहण्याचा प्लॅन करणार असाल तर एकट्यातच बघा.
advertisement
2/7
आपण बोलत असलेला हा सिनेमा 2022 मध्ये आलेला. या सिनेमातील बोल्ड सीन्सची जास्त चर्चा झाली. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांच्या मुख्य भूमिकेत आहे.
advertisement
3/7
या सिनेमाचं नाव आहे, 'गहराइयां'. शकुन बत्रा दिग्दर्शित हा सिनेमा आधुनिक नातेसंबंधांची गुंतागुंत, प्रेम, विश्वासघात यावर आधारित कहाणी आहे.
advertisement
4/7
दीपिकाने साकारलेले आलिशा खन्ना हे पात्र एक योग प्रशिक्षक आहे, जी तिच्या करिअर आणि नातेसंबंधात स्थिरतेचा अनुभव घेते. तिचा बॉयफ्रेंड करण (धैर्य करवा) एक अपयशी लेखक आहे, आणि त्यांच्या नात्याची गती पूर्वीसारखी नाही.
advertisement
5/7
कथेचा टर्न तेव्हा येतो जेव्हा आलिशाला तिच्या चुलत बहिणी टिया (अनन्या पांडे) च्या मंगेतर झैन (सिद्धांत चतुर्वेदी) शी भेट होते. येथे आलिशा आणि झैनमध्ये एक खोल आणि गुंतागुंतीचे आकर्षण निर्माण होते. दोघेही एकमेकांच्या भूतकाळातील अपूर्णता भरून काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा नाते आणखी क्लिष्ट बनते.
advertisement
6/7
चित्रपटाचा कॅमेरावर्क, सौंदर्यदृष्टी आणि संवाद या गोष्टी कथेला अधिक प्रभावशाली करतात. दीपिकाचा अभिनय दमदार आहे तर सिद्धांत एका असुरक्षित पुरुषाच्या भूमिकेत प्रभावीरीत्या दिसतो. अनन्या पांडेची टिया ही निरागस पण वेदनांनी भरलेली आहे, आणि तिची सिद्धांतसोबतची केमिस्ट्री चित्रपटात हायलाईट ठरते.
advertisement
7/7
2 तास 28 मिनिटांचा हा चित्रपट रोमँटिक आणि बोल्ड दृश्यांनी भरलेला आहे. कुटुंबीयांसाठी नाही, पण प्रौढ प्रेक्षकांसाठी भावनिक आणि दृश्यात्मक अनुभव देतो. दीपिकाचा ग्लॅमरस लूक आणि अनन्याचा बोल्ड अंदाज चित्रपटाला एक दृष्टीने मोहक व आकर्षक टच देतो. अमेझॉनवर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट