TRENDING:

30 वर्षांचा पाकिस्तानी रॅपर, LIVE कॉन्सर्टमध्ये फडकावला तिरंगा, ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत म्हणाला,"मी पुन्हा..."

Last Updated:
Talha Anjum on Indian Flag Controversy : पाकिस्तानचे प्रसिद्ध रॅपर तल्हा अंजुम यांना तिरंगा फडकावणे महागात पडले आहे. या रॅपरने LIVE कॉन्सर्टदरम्यान तिरंगा फडकावला होता.
advertisement
1/7
पाकिस्तानी रॅपरने LIVE कॉन्सर्टमध्ये फडकावला तिरंगा
प्रसिद्ध पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुम सध्या चांगलेच चर्चेत आहेत. LIVE कॉन्सर्टदरम्यान तिरंगा फडकावणे त्यांना चांगलच महागात पडलं आहे. पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तिरंगा फडकावतानाचा तल्हा अंजुम यांचा फोटो समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यांना मोठा प्रमाणावर ट्रोल केले गेले.
advertisement
2/7
तल्हा अंजुम यांनी याप्रकरणी आता आपली बाजू स्पष्ट केली आहे. ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत तल्हा यांनी स्पष्ट सांगितलं की,"वाद झाला तर होऊ द्या. मी पुन्हा असंच करेन". तल्हा अंजुम यांनी ट्वीट करत आपलं मत मांडलं आहे.
advertisement
3/7
तल्हा अंजुम यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,"माझ्या मनात द्वेषासाठी जागा नाही. माझ्या कलेला कोणत्याही सीमा नाहीत. त्यामुळे तिरंगा फडकावल्याने वाद होणार असेल तर होऊ द्या. मी पुन्हा हे करेन. उर्दू रॅपला कधीच कोणती सीमा नव्हती आणि यापुढेही नसेल".
advertisement
4/7
तल्हा अंजुम हे पाकिस्तानचे प्रसिद्ध रॅपर आहेत. अनेक देशांमध्ये ते शो करतात. 16 नोव्हेंबरला नेपाळमध्ये LIVE कॉन्सर्टदरम्यान त्यांनी तिरंगा फडकावला. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याने तल्हा अंजुम यांच्याकडे तिरंगा फेकला होता आणि रॅपरनेही तो अभिमानाने फडकावला.
advertisement
5/7
भारत–पाकिस्तान संबंधांच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहता अनेकांना तल्हा अंजुम यांचं तिरंगा फडकावणं खटकलं आहे. त्यामुळेच ते वादात सापडले आहेत. एकीकडे टिका होत असताना तल्हा यांनी स्पष्ट केले की ते पुन्हा भारतीय झेंडा फडकावतील. त्यांनी स्पष्ट सांगितले की कलेसाठी कोणत्याही सीमा नसतात.
advertisement
6/7
तल्हा अंजुम यांचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. तिरंगाला दिलेल्या या सन्मानामुळे अनेक भारतीय चाहते त्यांच्यापाठीशी उभे राहिले आहेत. तल्हा गेल्या काही वर्षांत प्रकाशझोतात आले आहेत.
advertisement
7/7
तल्हा अंजुम यांचे 2024 मध्ये दोन सोलो अल्बम रिलीज झाले आणि 'कट्टर कराची' या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 2021 मध्ये गुमान, अफसाने आणि पीएसएलचे अ‍ॅन्थम ग्रूव मेरा यांच्या माध्यमातून ते खूप प्रसिद्ध झाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
30 वर्षांचा पाकिस्तानी रॅपर, LIVE कॉन्सर्टमध्ये फडकावला तिरंगा, ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत म्हणाला,"मी पुन्हा..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल