TRENDING:

Suraj Chavan Home Photo : आधी पत्र्याचं घर आता त्याच ठिकाणी आलिशान बंगला, सूरज चव्हाणच्या नव्या घराचे 10 फोटो

Last Updated:
Suraj Chavan Luxury Bungalow : सूरज लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधी नव्या घरात प्रवेश करता आल्याने तो खूप आनंदी आहे. त्याच्या नव्या घराचे 10 फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
1/10
पत्र्याचं घर आता त्याच ठिकाणी आलिशान बंगला, सूरज चव्हाणच्या नव्या घराचे 10 फोटो
बारामती तालुक्यातील मोढवे गावात गरिबीत वाढलेला सूरज चव्हाण आज लाखो चाहत्यांचा लाडका स्टार आहे. टिकटॉकपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास खडतर होता.
advertisement
2/10
लहानपणी आई-वडिलांचं छत्र हरवलं, साध्या पत्र्याच्या घरात दिवस काढले पण प्रयत्नांचा आणि मेहनतीचा पक्का विश्वास बाळगणारा सूरज आज स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण करताना दिसतोय.
advertisement
3/10
सूरज चव्हाणच्या त्याच पत्र्याच्या घराच्या जागी आता दुमजली, अलिशान बंगला उभा राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर त्यांनी स्वतः बांधकामाची पाहणीही केली. अखेर हे घर पूर्ण झालं असून सूरजनं मोठ्या आनंदानं गृहप्रवेश केला.
advertisement
4/10
सूरजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये घराची भव्यता स्पष्टपणे दिसून येते. आत पाऊल टाकताच मोठ्ठा हॉल, त्यालगत मॉड्युलर किचन, प्रशस्त मोकळी जागा आणि हायटेक फ्लोरिंग लक्ष वेधतं.
advertisement
5/10
इतकंच नाही तर सूरजच्या घरात मोठ्या खिडक्या, चकचकीत काचा आणि हाय सीलिंग असल्याने संपूर्ण बंगला अधिक आलिशान दिसतो. वरच्या मजल्यावर प्रशस्त खोल्या असून घराबाहेर मोठं अंगणही आहे.
advertisement
6/10
सोशल मीडियावर 'गुलीगत धोका' म्हणत फेमस झालेल्या सूरज चव्हाणने आपल्या संघर्षमय आयुष्याची अनेक वेळा आठवण करून दिली आहे. कधी खायला पुरेसं नसताना, कधी फसवणूक होत असताना, तर कधी राहायला घर नसल्याने त्रास होतानाच्या आठवणी त्याने सांगितल्या.
advertisement
7/10
बिग बॉसचं विजेतेपद हे त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं. तरीदेखील त्याच्याकडे स्वतःचं घर नव्हतं. अखेर वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याचं स्वप्न पूर्ण झालं.
advertisement
8/10
येत्या 29 नोव्हेंबर 2025 रोजी सूरज चव्हाणचं लग्न आहे. लग्नाआधी त्याने नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. लग्नानंतर बायकोला घेऊन सूरज नव्या घरात येणार आहे.
advertisement
9/10
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण केलं. घरात प्रवेश करण्याआधी सूरजने अजित पवारांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
advertisement
10/10
सूरज चव्हाणने दादा त्याच्या लग्नाचं आमंत्रणही दिलं आहे. आता अजित दादा सूरज चव्हाणच्या लग्नाला हजेरी लावतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे सूरजच्या लग्नाला कोण कोण कलाकार मंडळी येणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan Home Photo : आधी पत्र्याचं घर आता त्याच ठिकाणी आलिशान बंगला, सूरज चव्हाणच्या नव्या घराचे 10 फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल