Health Tips : चहा प्यायल्यानंतर लगेच ॲसिडिटी होते? या टिप्स फॉलो करा, अजिबात होणार नाही त्रास..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to prevent acidity from tea : भारतामध्ये चहाचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. दिवसाची सुरुवात चहाने करण्याची अनेकांना सवय असते. पण चहा आरोग्यासाठी जितका चांगला असतो, तितकाच तो अनेकदा ॲसिडिटी आणि अपचनाची समस्याही निर्माण करतो. योग्य पद्धतीने चहा न प्यायल्यास सकाळी रिकाम्या पोटी ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते. मात्र काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या चहाचा आनंद ॲसिडिटीची चिंता न करता घेऊ शकता.
advertisement
1/7

चहा पिण्यापूर्वी दोन घोट पाणी प्या : तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चहा पिण्यापूर्वी लगेच थोडेसे पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिडिटी नियंत्रित राहते. यामुळे गॅस्ट्रिक वॉल शांत होते आणि चहाचा तीव्र परिणाम संतुलित होतो. यानंतर तुम्ही बिस्किट, टोस्ट किंवा हलका स्नॅक्स खाल्ला तर ॲसिडिटीची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
advertisement
2/7
सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे टाळा : सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पोटातील ॲसिड आणखी सक्रिय होते. यामुळे गॅस, जडपणा आणि पोटात मुरड येण्यासारख्या समस्या वाढू शकतात. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे उठल्यानंतर आधी एक-दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे पोटातील ॲसिडची पातळी नैसर्गिकरित्या संतुलित राहते. त्यानंतरच तुम्ही तुमच्या चहाचा आस्वाद घ्यावा.
advertisement
3/7
कडक चहा टाळा आणि हलके स्नॅक्स आवश्यक : फार कडक चहा पोटात जाऊन ॲसिड रिफ्लेक्ट करतो, ज्यामुळे ॲसिडिटी लगेच वाढते. म्हणून हलका आणि कमी दूध घातलेला चहा पिणे उत्तम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही फक्त चहा पिऊ नका. चहासोबत भाजलेले शेंगदाणे, टोस्ट, मुरमुरे किंवा शुगर-फ्री बिस्किट यांसारखे हलके स्नॅक्स नक्की घ्या. स्नॅक्समुळे चहाचा प्रभाव संतुलित होतो.
advertisement
4/7
आले, वेलची आणि बडीशेपची जादू : चहामध्ये आले आणि वेलची फक्त चवच देत नाहीत, तर पचनक्रिया देखील मजबूत करतात. यामुळे गॅस आणि ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते.
advertisement
5/7
चहा प्यायल्यानंतरचा उपाय : जर चहा प्यायल्यानंतरही तुम्हाला जळजळ जाणवत असेल, तर थोडीशी बडीशेप चघळा. बडीशेप लगेच पोट शांत करण्यास मदत करते.
advertisement
6/7
चहा आणि पाण्यामधील अंतर : याव्यतिरिक्त, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. किमान 15-20 मिनिटांचे अंतर ठेवा. असे केल्याने ॲसिडिटीची समस्या कमी होऊन तुम्ही चहाचा निर्धोक आनंद घेऊ शकता.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : चहा प्यायल्यानंतर लगेच ॲसिडिटी होते? या टिप्स फॉलो करा, अजिबात होणार नाही त्रास..