खेळताना ग्रेनेड उचललं, दोन्ही हात गमावले, 40 फ्रॅक्चर, डॉक्टरांनी म्हटलं आयुष्य 'कठीण' मालविका यांनी जिद्दीने जिंकले
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉ. मालविका अय्यर यांनी ग्रेनेड स्फोटात दोन्ही हात गमावले तरी जिद्दीनं पीएचडी पूर्ण केली, नारी शक्ती पुरस्कार मिळवला आणि दिव्यांगांसाठी प्रेरणा ठरल्या.
advertisement
1/9

किस्मत सिर्फ हाथों की लकीरों तक निर्भर नहीं करती...हे पुन्हा एकहा या तरुणीनं संपूर्ण जगाला दाखवून दिलं. हात नाहीत म्हणून ती रडत राहिली नाही तर लढली, एका छोट्या चुकीमुळे या महिलेनं आपले हात गमावले, डॉक्टरांनी सांगितलं यातून सावरणं कठीण, मात्र तिची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा या जोरावर या तरुणीनं आज जग जिंकलं आहे.
advertisement
2/9
दोन्ही हात गेले, पायाला 40 फ्रॅक्चर आणि डॉक्टर म्हणाले आयुष्य खूप कठीण आहे. मात्र मालविका यांच्या डोळ्यात एक जिद्द होती, त्या म्हणाल्या आयुष्य कठीण असेल पण माझं असेल. हात नसले तरी मनात आणि डोळ्यात स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी त्या झटल्या.
advertisement
3/9
बाहेर पडलेले ग्रेनेड खेळणं म्हणून हातात उचललं आणि त्यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आपली दोन्ही हात गमावले. ग्रेनेडच्या झालेल्या स्फोटात दोन्ही हात गमावले आहेत. त्या यातून खचल्या नाहीतर तर जिद्दीनं उभ्या राहिल्या. राजस्थानमधील बीकानेर इथे राहतात.
advertisement
4/9
दारूगोळ्याच्या गोदामाला आग लागल्यानंतर एक ग्रेनेड थेट १३ वर्षीय मालविका यांच्या गॅरेजमध्ये येऊन पडला. दुर्दैवाने, मालविका यांनीच तो ग्रेनेड हातात घेतला आणि स्फोट झाला. या स्फोटात त्यांचे दोन्ही हात पूर्णपणे निकामी झाले, पायाला गंभीर दुखापत झाली आणि नसांमध्ये पक्षाघात झाला.
advertisement
5/9
मालविका यांनी त्यांच्या ऑपरेशनदरम्यान झालेल्या एका गंभीर चुकीबद्दल सांगितले. स्फोटानंतर मालविका यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर खूप दबावाखाली होते, त्यामुळे उजवा हात शिवताना त्यांच्याकडून शस्त्रक्रिया करताना चूक झाली.
advertisement
6/9
मालविका म्हणाल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हाताच्या ज्या भागावर हाड बाहेर आलं, तो भाग मांसाने झाकलेला नाही. जर हा हात चुकून कुठेही आदळला, तर मी वेदनेने मरून जाईन." मात्र, याच चुकीने त्यांच्यासाठी चमत्काराप्रमाणे काम केलं.
advertisement
7/9
"तीच चूक माझ्यासाठी अविश्वसनीय सिद्ध झाली आहे. कारण ते बाहेर आलेले हाड माझ्या एकमेव बोटाप्रमाणे काम करते! याच हाडाच्या मदतीने मी टाइप करते," असं त्यांनी सांगितलं. बाहेर आलेल्या याच असामान्य बोटाच्या मदतीने त्यांनी केवळ आपली पीएचडी पूर्ण केली.
advertisement
8/9
मोठं संकट कोसळलं, आयुष्य उद्ध्वस्त होणार याची भीती होती, मात्र या संकटातही हार न मानता जीवनात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेणाऱ्या व्यक्तींची कथा नेहमीच प्रेरणादायी ठरते. अशीच एक कहाणी आहे ३० वर्षीय डॉ. मालविका अय्यर यांची आहे. प्रत्येकानं ही कहाणी वाचली पाहिजे, त्यांच्याकडून ही जिद्द ही प्ररणा घेतली पाहिजे अशी आहे.
advertisement
9/9
मालविका सोशल मीडियावरही बऱ्यापैकी अॅक्टिव आहेत. दुर्घटना नाही तर हिम्मत माणसाला एक नवी ओळख निर्माण करण्याची संधी देते. त्यांना 2018 मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मालविका आज प्रत्येक दिव्यांग तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेत. मात्र इतकंच नाही तर प्रत्येकानं हार न मानून जाता जिद्दीनं उभं राहायला हवं ते यांच्याकडून शिकावं
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
खेळताना ग्रेनेड उचललं, दोन्ही हात गमावले, 40 फ्रॅक्चर, डॉक्टरांनी म्हटलं आयुष्य 'कठीण' मालविका यांनी जिद्दीने जिंकले