Pankaj Dheer : 'कर्णा'ने सुपरस्टार बनवलं, पण तो साकारणं जीवावर बेतलं होतं; पंकज धीर यांच्यावर आलेली सर्जरीची वेळ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pankaj Dheer : अभिनेते पंकज धीर यांना महाभारत या मालिकेनं ओळख मिळवून दिली. पण कर्णाची भूमिका साकारणं त्यांच्या जीवावर बेतलं असतं. महाभारताच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं?
advertisement
1/9

बी.आर.चोप्रा यांची महाभारत ही अजरामर मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. टेलिव्हिजनच्या इतिहासातील ही सर्वात भव्य मालिका समजली जाते.
advertisement
2/9
या मालिकेतील कर्ण म्हणजेच अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. पंकज यांनी महाभारतात साकारलेली कर्णाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली.
advertisement
3/9
त्यांच्या करिअरला या भूमिकेनं मोठी मदत केली. पंकज यांना कॅन्सर झाला होता. अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
advertisement
4/9
महाभारत मालिकेच्या शूटींगवेळी अभिनेते पंकज धीर जखमी झाले होते. सेटवरील हा प्रसंग अनेकांना माहिती नाही.
advertisement
5/9
1988 ते 1990 दरम्यान या मालिकेचे एकूण 94 एपिसोड रिलीज झाले होते. लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा प्रसारित झाली होती.
advertisement
6/9
'महाभारत'मध्ये पंकज धीर यांनी 'कर्ण'ची भूमिका साकारली होती. त्यांच्या सोबत मुकेश खन्ना, नितीश भारद्वाज आणि पुनीत इस्सर यांसारखे दिग्गज कलाकारही होते.
advertisement
7/9
या मालिकेतील युद्धाचे सीन खूप रिअलिस्टिक दाखवले गेले होते. कलाकारांना शूटिंगपूर्वी तलवारबाजी आणि धनुर्विद्येचे विशेष प्रशिक्षण दिलं होतं. जेणेकरून कोणतीही चूक होऊ नये.
advertisement
8/9
मात्र, एका युद्धच्या सीन शूट करताना एक भयंकर अपघात घडला. शूटिंग चालू असताना पंकज धीर यांच्या डोळ्याजवळ बाण लागून ते गंभीर जखमी झाले.
advertisement
9/9
या घटनेने संपूर्ण सेटवर खळबळ उडाली आणि सर्वजण घाबरले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pankaj Dheer : 'कर्णा'ने सुपरस्टार बनवलं, पण तो साकारणं जीवावर बेतलं होतं; पंकज धीर यांच्यावर आलेली सर्जरीची वेळ