Pankaj Tripathi: दसऱ्याआधीच पंकज त्रिपाठींची मोठी खरेदी! मुंबईत घेतले 2 लग्झरी अपार्टमेंट, कोट्यवधींचा केला खर्च
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Pankaj Tripathi: बॉलिवूडमधील बहुगुणी अभिनेता पंकज त्रिपाठी आज आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करून बसले आहेत. आज ते कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत.
advertisement
1/7

बॉलिवूडमधील बहुगुणी अभिनेता पंकज त्रिपाठी आज आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करून बसले आहेत. आज ते कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत.
advertisement
2/7
एकेकाळी छोट्या छोट्या भूमिकांपासून प्रवास सुरू केलेल्या पंकज यांनी आता असा टप्पा गाठला आहे की, त्यांचं नावच प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणतं. कोट्यवधी चाहत्यांसोबत आता ते कोट्यवधीच्या संपत्तीचे मालकही आहेत.
advertisement
3/7
इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR) ने रिअल इस्टेट मार्केटप्लेस स्क्वेअरयार्ड्स कडून मिळवलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने मुंबईत 10.85 कोटी रुपयांना दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. पहिले अपार्टमेंट अंधेरी पश्चिमेतील सीब्लिस बिल्डिंगमध्ये आहे, जे पंकज त्रिपाठी यांनी त्यांची मुलगी आशीसह खरेदी केले होते.
advertisement
4/7
या पहिल्या अपार्टमेंटची किंमत 9.98 कोटी रुपये आहे. या घराचे क्षेत्रफळ अंदाजे 2,372 चौरस फूट आहे आणि त्यात तीन कारसाठी पार्किंगची सुविधा आहे.
advertisement
5/7
पंकजची पत्नी मृदुला त्रिपाठी आणि मुलगी आशी यांनी कांदिवली पश्चिमेतील आशापुरा हेरिटेज बिल्डिंगमध्ये दुसरे अपार्टमेंट खरेदी केले. घराची किंमत 8.7 कोटी आहे आणि त्याचे क्षेत्रफळ अंदाजे 425 चौरस फूट आहे. या दोन्ही खरेदीसाठी कुटुंबाने लाखोंची स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरले आहे.
advertisement
6/7
पंकज त्रिपाठी नुकतेच अनुराग बसू दिग्दर्शित इन डिनो मध्ये दिसले होते. या मल्टीस्टाररमध्ये त्यांच्या सहज अभिनयाने समीक्षकांकडून दाद मिळवली. लवकरच ते बहुचर्चित मिर्झापूर 3 आणि फॅमिली एंटरटेनमेंट मध्ये प्रेक्षकांना भेटणार आहे.
advertisement
7/7
बिहारच्या छोटेगावातून आलेल्या पंकज यांनी बॉलिवूडमध्ये आपलं नाव टिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली. पंकज त्रिपाठी यांची अंदाजित एकूण संपत्ती 40 कोटी ते 45 कोटी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pankaj Tripathi: दसऱ्याआधीच पंकज त्रिपाठींची मोठी खरेदी! मुंबईत घेतले 2 लग्झरी अपार्टमेंट, कोट्यवधींचा केला खर्च