Shefali Jariwala : मध्यरात्री कापराचा सुगंध, वाऱ्याची झुळूक, शेफालीच्या मृत्यूच्या 1 महिन्यानंतर असं काय घडलं! थरथर कापू लागला पराग त्यागी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shefali Jariwala : अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूनंतर तिच्या घरी असं काही घडलं की मध्यरात्री तिचा नवरा पराग त्यागी थरथर कापू लागला होता.
advertisement
1/9

इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या जाण्याने इंडस्ट्री हळहळली. त्यांच्या जाण्याचं निर्माण झालेली पोकळी कधीच न भरून निघणारी आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला.
advertisement
2/9
'कांटा लगा' गर्लच्या निधनाने तिचा नवरा अभिनेता पराग त्यागीवर दु:खाचा डोंगर कोसळला. पराग अजूनही शेफालीला विसरू शकलेला नाही. अलीकडेच परागने शेफालीचा टॅटू त्याच्या छातीवर गोंदवून घेतला होता.
advertisement
3/9
त्यानंतर आता परागने एक शॉकिंग गोष्ट सांगितली ती म्हणजे शेफालीच्या मृत्यूनंतरही त्याला तिचा भास होतोय. त्याने त्याच्याबरोबर घडलेला एक प्रसंग सोशल मीडियावर शेअर केलाय.
advertisement
4/9
पराग त्यागीनं सांगितलं, शेफालीच्या निधनानंतर साधारण एक महिना उलटल्यानंतर तो एका रात्री घरी एकटा होता. भिंतीवर टांगलेल्या तिच्या फोटोकडे पाहत तो रडत होता.
advertisement
5/9
"मी तिच्या फोटोकडे बघून तिला विचारत होतो की, 'तू मला का सोडून गेलीस'. तेव्हाच आमच्या रुममध्ये अचानक कापूरचा सुगंध आला."
advertisement
6/9
"शेफालीला कापूरचा सुगंध खूप आवडायचा. मी आजूबाजूला पाहिलं पण कुठेही कोणी कापूर जाळला नव्हता."
advertisement
7/9
"त्याक्षणी मला माझ्या डोक्यापासून पायापर्यंत एक शक्ती जाणवली पण ती एका वेगळ्या रुपात. माझे हात पाय कापू लागले आणि मला जाणवलं की शेफाली त्याक्षणी तिथे होती."
advertisement
8/9
पराग पुढे म्हणाला की, "अनेकदा मी असे काही बोलतो की, तेव्हा मला माझ्या आजूबाजूचे लोक म्हणतात की हे तर शेफालीचे शब्द आहेत. आमचं नातं आजही आहे फक्त त्याला एक वेगळं रुप आलं आहे."
advertisement
9/9
"हा अनुभव खूप घाबरवणारा नव्हता तर मला सुखावणारा होता. जसं की कोणीतरी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवावा."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shefali Jariwala : मध्यरात्री कापराचा सुगंध, वाऱ्याची झुळूक, शेफालीच्या मृत्यूच्या 1 महिन्यानंतर असं काय घडलं! थरथर कापू लागला पराग त्यागी