'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याने दिली Good News! दिवाळीच्या मुहूर्तावर दुसऱ्यांदा झाला बाबा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
चला हवा येऊ द्या शोमधील प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
1/9

सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू आहे. अनेक कलाकार मंडळी सुट्टी निमित्तानं बाहेरगावी फिरायला गेली आहेत. अनेक ठिकाणी दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली आहे.
advertisement
2/9
अशातच चला हवा येऊ द्यामधील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. अभिनेता बाबा झाला असून दिवाळीच्या मुहूर्तावर त्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे.
advertisement
3/9
अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
advertisement
4/9
आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे अंकुर वाढवे. अंकुरने सोशल मीडियावर बाळाचा हात हात घेतलेला फोटो शेअर केला आहे. अंकुरला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे.
advertisement
5/9
'दुसऱ्यांदा बाबा झालो... यावेळी मुलगा', असं कॅप्शन देत अंकुरने फोटो शेअर केलेत.
advertisement
6/9
अंकुरने 2019 साली कोर्ट मॅरेज केलं. निकिता खडसे असं त्याच्या बायकोचं नाव आहे.
advertisement
7/9
2021मध्ये अंकुर आणि निकिता यांना पहिली मुलगी झाली. त्यानंतर चार वर्षांनी त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला आहे.
advertisement
8/9
अंकुरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास त्याची 'चला हवा येऊ द्या' मधील छोटूची भूमिका साकारली होती.
advertisement
9/9
त्याचप्रमाणे तो 'करुन गेलो गाव', 'सर्किट हाऊस', 'गाढवाचं लग्न', 'आम्ही सारे फर्स्ट क्लास' सारख्या सिनेमात काम केलं आहे. सध्या तो अंजू उडाली भुर्रर्रर्र या नाटकांत काम करतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याने दिली Good News! दिवाळीच्या मुहूर्तावर दुसऱ्यांदा झाला बाबा