Bollywood Actress : 'बोल्ड सून सांभाळणं त्यांच्यासाठी कठीण', मुस्लिम कुटुंबात लग्न केलेल्या अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Actress : लग्नानंतर तिने बॉलिवूडपासून अचानक अंतर का घेतले, यामागचे कारण तिने नुकत्याच एका मुलाखतीत उघड केले आहे.
advertisement
1/8

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा बेदी हिने २२ वर्षांपूर्वी फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर तिने बॉलिवूडपासून अचानक अंतर का घेतले, यामागचे कारण तिने नुकत्याच एका मुलाखतीत उघड केले आहे. पूजाचा बोल्ड स्वभाव आणि मुस्लिम कुटुंबातील रूढीवाद, यामुळे तिला मोठा निर्णय घ्यावा लागला होता.
advertisement
2/8
पूजा बेदीने नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. लग्नानंतर करिअर सोडण्यामागचे कारण सांगताना ती म्हणाली, "माझं लग्न एका रूढीवादी मुस्लिम कुटुंबातून आलेल्या फरहानशी झालं होतं. त्यांच्यासाठी सेटवर जाणारी, बोल्ड भूमिका करणारी सून स्वीकारणं तेव्हा शक्यच नव्हतं."
advertisement
3/8
पूजा म्हणाली की, त्या काळात चित्रपटसृष्टीबद्दल खूप गॉसिप व्हायच्या. एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की, त्यातील अभिनेत्रींची नावे अभिनेत्यासोबत जोडली जायची.
advertisement
4/8
पूजाच्या मते, त्या काळात आजसारखी परिस्थिती नव्हती. तिने कामसूत्र जाहिरात केल्यामुळे तिला 'बोल्ड सिम्बॉल' म्हणून ओळख मिळाली होती.
advertisement
5/8
ती म्हणाली, "सासरच्या लोकांसाठी 'बोल्ड सून' किंवा 'बोल्ड-सिम्बॉल सून' सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट होती. लग्न झाल्यावर अभिनेत्री सिनेमे करणं सोडायच्या, असा तेव्हाचा समज होता."
advertisement
6/8
पूजा बेदीने सांगितले की, कोणताही निर्णय घेण्याआधी तिने खूप विचार केला. "मला कोणत्याही कुटुंबात जाऊन तिथल्या लोकांना गिल्टी फील करायचं नव्हतं. एकतर लग्न करू नका किंवा लग्न करायचं असेल, तर बाकी गोष्टी सोडा," असा निर्णय तिने घेतला.
advertisement
7/8
या निर्णयामुळे तिने अनेक मोठे प्रोजेक्ट्स सोडले. ज्या चित्रपटांसाठी तिने तारखा दिल्या होत्या, त्या सगळ्यांचे साईनिंग अमाउंट तिने परत केले. एवढेच नव्हे, तर तिची गाजलेली 'कामसूत्र' जाहिरात पूर्णपणे बदलण्यात आली होती. तिला आधीच्या मानधनाच्या आठपट मानधनाची ऑफर मिळाली होती, पण तिने तीही नाकारली.
advertisement
8/8
दरम्यान, फरहान आणि पूजा यांचा घटस्फोट झाला असला तरी, त्यांच्यात आजही चांगले संबंध आहेत. ते दोघे एकत्र मुलांचा सांभाळ करतात आणि पूजा फरहानला आपला बेस्ट फ्रेंड मानते. फरहानच्या दुसऱ्या लग्नाच्या वेळीही पूजा खूप उत्साही होती, असे तिने सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Actress : 'बोल्ड सून सांभाळणं त्यांच्यासाठी कठीण', मुस्लिम कुटुंबात लग्न केलेल्या अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा