'सलमानचा चित्रपट करणार नाही'; महेश मांजरेकरांनी सांगितलं इंडस्ट्री हादरवणारं ते सत्य
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahesh Manjrekar on Salman Khan : महेश मांजरेकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत सलमान खानसोबत यापुढे काम करणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/7

'अंतिम: द फायनल ट्रुथ' हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सलमान खान फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती.
advertisement
2/7
'अंतिम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने महेश मांजरेकरांना प्रचंड त्रास दिला असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
3/7
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले,"सलमान खानचा 'अंतिम' हा चित्रपट मी केला. पण आता यापुढे मला कोणी विचारलं सलमानचा दुसरा चित्रपट करशील का? तर या प्रश्नाचं मी नाही असं उत्तर देईल".
advertisement
4/7
महेश मांजरेकर म्हणाले,"सलमानला वाटतं त्याला सिनेमा कळतो. त्याचे वडील मेकर आहेत".
advertisement
5/7
महेश मांजरेकर पुढे म्हणाले,"मी थोडासा हेडस्ट्राँग आहे. त्यामुळे एकदा काही कारणाने सलमान रात्री 3 वाजता भेटायला आला".
advertisement
6/7
सलमान खान त्यावेळी महेश मांजरेकरांना म्हणालेला,"तुम्ही मला शिव्या दिल्या". त्यावर मी त्याला म्हटलेलं,"मी तुला शिव्या देत नसून तुझ्यात जो दिग्दर्शक लपलाय त्याला शिव्या देतोय. तू सिनेमा मला दिला आहेस ना मग आता बाकी विसरुन जा".
advertisement
7/7
'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 59.11 कोटींचा गल्ला जमवला होता. Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सलमानचा चित्रपट करणार नाही'; महेश मांजरेकरांनी सांगितलं इंडस्ट्री हादरवणारं ते सत्य