Pooja-Soham Haldi: हळद लागली! पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नाच्या विधींना दणक्यात सुरुवात; हळदीचे Inside फोटो आले समोर!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Pooja Birari-Soham Bandekar Haldi: मेहंदीनंतर आता पूजा आणि सोहमच्या हळदी समारंभाचे फोटो इनसाइड समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघेही धमाल करताना दिसत आहेत.
advertisement
1/10

मुंबई: मराठी मालिकाविश्वातील सध्याची सर्वात चर्चित जोडी, अभिनेत्री पूजा बिरारी आणि निर्माता सोहम बांदेकर यांच्या लग्नाच्या विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पूजा आता लवकरच लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपे आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या घरची सून होणार आहे.
advertisement
2/10
काही दिवसांपूर्वी त्यांचे केळवण मोठ्या थाटात पार पडले होते, ज्यामुळे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, मेहंदीनंतर आता या दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये पूजा आणि सोहमचा पहिला एकत्र फोटो समोर आला आहे.
advertisement
3/10
पूजा आणि सोहम यांच्या हळदी समारंभाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे, ज्यामुळे हा सोहळा अधिकच खास बनला आहे.
advertisement
4/10
अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री सानिका बनारसवाले यांसारखे लोकप्रिय कलाकार हळदीला पोहोचले होते. सोशल मीडियावर या समारंभाचे काही धमाल व्हिडिओ समोर आले आहेत.
advertisement
5/10
हळदीसाठी पूजाने सुंदर पारंपरिक लूक केला होता. 'हळद लागली गं' म्हणत पूजा या सोहळ्यात बेभान होऊन नाचताना दिसली आहे.
advertisement
6/10
समोर आलेल्या फोटोंमध्ये पूजा आणि सोहम यांना हळद लावण्यात आली असून, त्यांचे औक्षण सुरू असल्याचेही दिसत आहे.
advertisement
7/10
सगळ्यात गोड क्षण म्हणजे, पूजा आणि सोहमच्या हळदी समारंभाला सोहमच्या लाडक्या सिंबानेही हजेरी लावली. १६ वर्षीय सिंबाने पूजा आणि सोहमची हळद एन्जॉय केली. सिंबा हा सोहमचा लाडका असून पूजाच्या मेहंदीमध्येही खास त्याचं चित्र रेखाटण्यात आलं आहे.
advertisement
8/10
या दोघांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.
advertisement
9/10
पूजा बिरारीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी ती 'स्वाभिमान' आणि 'साजणा' या मालिकांमध्येही दिसली होती.
advertisement
10/10
सोहम बांदेकर हा आदेश-सुचित्रा बांदेकर यांच्या 'बांदेकर प्रोडक्शन्स'चा निर्माता म्हणून कार्यरत आहे. मराठी कलाविश्वातील या नव्या जोडीच्या लग्नाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pooja-Soham Haldi: हळद लागली! पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नाच्या विधींना दणक्यात सुरुवात; हळदीचे Inside फोटो आले समोर!