TRENDING:

प्रभाससोबत जोडलं नाव, अनुष्का शेट्टीनं पहिल्यांदाच सांगितली लव्ह स्टोरी; म्हणाली, 'तो मला I Love You म्हणाला...'

Last Updated:
Anushka Shetty Love Story: अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं नाव अभिनेता प्रभाससोबत जोडलं गेलं आहे. दोघांनी कधीच या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. अनुष्काने पहिल्यांदाच तिची लव्ह स्टोरी सांगितली.
advertisement
1/9
'तो I Love You म्हणाला...' अनुष्का शेट्टीनं पहिल्यांदाच सांगितली लव्ह स्टोरी
नवी दिल्ली. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या प्रतिभेने आणि धाडसाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
advertisement
2/9
सिनेमातील अभिनेत्रींच्या फॅनफॉलोविंगला तोड नाही. ऑनस्क्रिन दिसणाऱ्या अभिनेत्रींच ऑफस्क्रिन आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.
advertisement
3/9
बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनुष्काच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
advertisement
4/9
अनुष्काचं नाव अभिनेता प्रभाससोबत जोडलं गेलं आहे. दोघेही वयाची चाळीशी ओलांडली तरी सिंगल आहेत. दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असंही अनेकदा बोललं गेलं पण या चर्चांना कधीच दुजोरा मिळाला नाही.
advertisement
5/9
अनुष्काचं वय आता 43 वर्ष आहे. ती कधीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार चर्चा करत नाही. पण अलिकडेच एका मुलाखतीत तिने तिची स्कूलवाली लव्ह स्टोरी सांगितली.
advertisement
6/9
प्रभाससोबत लग्नाच्या चर्चा सुरू असताना अनुष्कानं तिच्या शाळेतील एक छोटीशी लव्हस्टोरी सांगितली.  शाळेत असताना त्याने मला प्रपोज केलं होतं असं म्हणत अनुष्काने खुलासा केला आहे.
advertisement
7/9
अनुष्का म्हणाली, "मी सहावीत होते. एक मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'मी तुझ्यावर प्रेम करतो.' त्या वयात मला त्याचा अर्थही समजला नव्हता. पण तो जे काही म्हणाला, मी फक्त 'ठीक आहे' असं म्हटलं. माझ्या आयुष्यात ती एक सुंदर आठवण आहे."
advertisement
8/9
बाहुबली 1 आणि बाहुबली 2 ने अनुष्काला ओळख मिळवून दिली.  बाहुबलीच्या यशानंतर अनुष्काने सिनेमातून ब्रेक घेतला. मोठ्या ब्रेकनंतर ती 'मिस शेट्टी मिस्टर पॉली शेट्टी' मध्ये दिसली होती. अलिकडेच तिचा 'घाटी' हा सिनेमाही रिलीज झाला होता.
advertisement
9/9
अनुष्काने आतापर्यंत रजनीकांत, विजय, नागार्जुन, प्रभास आणि अल्लू अर्जुन सारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. 2005 मध्ये आलेल्या 'सुपर' या तेलुगू सिनेमातून तिने डेब्यू केला. . माधवनसोबत 'रेंडू' हा तमिळ सिनेमा  रजनीकांतसोबतचा 'लिंगा', विजयसोबतचा 'वेट्टैकरण', सूर्यासोबतचा 'सिंघम' सारख्या सिनेमात तिनं काम केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रभाससोबत जोडलं नाव, अनुष्का शेट्टीनं पहिल्यांदाच सांगितली लव्ह स्टोरी; म्हणाली, 'तो मला I Love You म्हणाला...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल