TRENDING:

तोच प्लॉट अन् तिच स्टोरी... 17 मुलं किडनॅप, रोहित आर्यने 3 वर्षांपूर्वी चित्रपटात घडलं तेच मुंबईत केलं!

Last Updated:
Mumbai hostage incident : मुंबईतील पवई परिसरात दिवसाढवळ्या एका माथेफिरूने एका स्टुडिओमध्ये तब्बल १७ मुलांना बंधक ठेवले. या घटनेने काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची आठवण करून दिली आहे.
advertisement
1/7
तोच प्लॉट अन् तिच स्टोरी... रोहित आर्यने 3 वर्षांपूर्वी चित्रपटात घडलं तेच केलं!
मुंबई: मुंबईतील पवई परिसरात दिवसाढवळ्या एक धक्कादायक प्रकार घडला, ज्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली. एका माथेफिरूने एका स्टुडिओमध्ये तब्बल १७ मुलांना बंधक ठेवले. विशेष म्हणजे, ही मुले एका वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी पवईत आली होती. दुपारचे दीड वाजून गेले तरी मुले जेवणासाठी बाहेर आली नाहीत, तेव्हा पालकांना संशय आला.
advertisement
2/7
तब्बल दोन तासांनी आरोपी रोहित आर्यन याने एक व्हिडिओ जारी केला, ज्यात त्याने मुलांना जाळून टाकण्याची धमकी दिली. तत्परता दाखवत मुंबई पोलिसांनी त्वरित पाऊले उचलली आणि स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या बाथरूममधून स्टुडिओत प्रवेश केला.
advertisement
3/7
आरोपी रोहितने पोलिसांवर गोळीबार केला, तेव्हा पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. अखेर गोळीबारात रोहित जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
4/7
या घटनेने काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची आठवण करून दिली आहे. २०२२ मध्ये अशाच विषयावर आधारित एक जबरदस्त चित्रपट रिलीज झाला होता, ज्याची आठवण या घटनेमुळे ताजी झाली. हा चित्रपट हॉटस्टारवर रिलीज झाला होता, ज्याचं नाव आहे 'अ थर्सडे' (A Thursday).
advertisement
5/7
या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम हिने 'नैना' नावाच्या शिक्षिकेची मुख्य भूमिका साकारली होती. नैना तिच्या होणाऱ्या पतीच्या घरीच एक प्लेस्कूल चालवते. नेहमीप्रमाणे पालक मुलांना सुरक्षितपणे प्लेस्कूलमध्ये सोडून जातात. पण थोड्याच वेळात नैना पोलीस स्टेशनमध्ये फोन करून १६ मुलांना बंधक बनवल्याचे जाहीर करते.
advertisement
6/7
नैनाची मागणी असते की, तिला देशाच्या पंतप्रधानांशी थेट भेटून बोलायचे आहे. यानंतर पोलीस, पंतप्रधान आणि नैना यांच्यात सुरू होणारा हाय व्होल्टेज ड्रामा आणि तिची नेमकी मागणी काय आहे, याचा थरार 'अ थर्सडे' मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे दाखवला आहे.
advertisement
7/7
या चित्रपटात डिंपल कपाडिया, नेहा धुपिया आणि अतुल कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तथापि, यामी गौतमचा अभिनय खूप दमदार होता. तुम्हालाही सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील, तर हा सिनेमा तुम्ही नक्की पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तोच प्लॉट अन् तिच स्टोरी... 17 मुलं किडनॅप, रोहित आर्यने 3 वर्षांपूर्वी चित्रपटात घडलं तेच मुंबईत केलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल