हौस करावी तर प्राजक्तासारखी! लग्नच नाही, जेजुरी दर्शनासाठीही हटके ब्लाऊज, त्या स्पेशल डिझाइनची होतेय चर्चा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिच्या लग्नात तिची सगळी हौस करून घेतली. प्राजक्ताचे लग्नातील ब्लाऊज तर हटके होतेय. पण जेजुरी दर्शनासाठीही प्राजक्तानं हटके ब्लाऊज शिवला होता.
advertisement
1/7

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता खुटवड घराण्याची सून झाली आहे. 2 डिसेंबर रोजी प्राजक्ता आणि शंभुराज खुटवड यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात, पारंपरिक रीतीरिवाजांनुसार पार पडला.
advertisement
2/7
लग्नानंतरच्या प्राजक्ताच्या लूकपासून तिच्या नवऱ्या शंभुराजपर्यंत सर्व गोष्टी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्राजक्ता आणि शंभुराज जेजुरी दर्शनाला पोहोचले आहेत. दोघांच्या जेजुरी दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/7
हौस करावी तर ती प्राजक्ता गायकवाडसारखी. लग्नाच्या आधीच्या सगळ्या विधींपासून, लग्न आणि लग्नानंतर जेजुरी दर्शनापर्यंत प्राजक्ताच्या हटके ब्लाऊजनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. जेजुरी दर्शनसाठी प्राजक्तानं घातलेल्या हटके ब्लाऊजवरची ती डिझाइन व्हायरल होतेय.
advertisement
4/7
प्राजक्ताने विवाहानंतर 3 डिसेंबरला या दोघांनी जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेतलं. महाराष्ट्रात श्रद्धेची पवित्र मानली जाणारी ही जागा नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानली जाते. त्यामुळेच प्राजक्ता व शंभुराज यांनीही या देवस्थानाला भेट देत आशीर्वाद घेतले.
advertisement
5/7
जेजुरीतली एक जुनी परंपरा म्हणजे नवऱ्याने नवरीला उचलून गड चढणे. हीच परंपरा पाळताना शंभुराजने प्राजक्ताला उचलून गड चढला. दोघांनी खंडोबाच्या मूर्तीसमोर पूजा केली आणि विधी पार पाडले. त्यानंतर भंडाऱ्याची उधळण करत त्यांनी मनसोक्त जल्लोष केला.
advertisement
6/7
जेजुरी दर्शनसाठी प्राजक्ता पिवळ्या रंगाच्या पारंपरिक साडी नेसली होती. तिच्या ब्लाऊजवर चंद्रकोर असलेली खंडोबाच्या पगडीची डिझाइन पॅचमध्ये लावली आहे. तर शंभुराजने पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. दोघांचा साधा पण आकर्षक लूक चाहत्यांना विशेष आवडला.
advertisement
7/7
प्राजक्ताने तिच्या लग्नविधीसाठी हिरवी साडी नेसली होती. या साडीच्या ब्लाऊजवर तिने सप्तपदी लिहिली होती. तिच्यावर ही साडी खूप सुंदर दिसत होती. प्राजक्ताने वरमालासाठी लाल रंगाची डिझाइनर साडी नेसली होती. त्या साडीच्या ब्लाऊजवर एका हातावर दोघांचा फोटो होता. तर दुसऱ्या हातावर सौभाग्यवती भव: असं लिहिलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हौस करावी तर प्राजक्तासारखी! लग्नच नाही, जेजुरी दर्शनासाठीही हटके ब्लाऊज, त्या स्पेशल डिझाइनची होतेय चर्चा