TRENDING:

जया यांचं स्टेटमेन्ट बच्चन कुटुंबाला पडणार महागात, पापाराझी उचलणार मोठं पाऊल! म्हणाले, 'त्यांना कळत नसेल तर...'

Last Updated:
ज्येष्ठ अभिनेत्री जया यांनी पापाराझींबद्दल केलेलं वादग्रस्त स्टेटमेन्ट बच्चन कुटुंबाला महागात पडणार असं दिसतंय. जया बच्चन यांच्या स्टेटमेन्टवर पापाराझी मोठं पाऊल उचलणार....?
advertisement
1/7
जया यांचं स्टेटमेन्ट बच्चन कुटुंबाला पडणार महागात, पापाराझी उचलणार मोठं पाऊल!
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेची खासदार जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. जया बच्चन आणि पापाराझी यांचा नेहमीच छत्तीसचा आकडा असल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान एका इव्हेंटमध्ये जया बच्चन यांनी पापाराझींबद्दल वक्तव्य केलं.
advertisement
2/7
घाणेरडे कपडे घालणारे, मोबाइल घेऊन फिरणारे आणि मीडिया नसलेले लोक असं त्या पापाराझींना म्हणाल्या. जया बच्चन आणि पापाराझींमध्ये कायमच वाद झालेत. पम यावेळी जया यांनी केलेलं वक्तव्य ऐकून पापाराझी चांगलेच संतापलेत.  जया बच्चन यांना बायकॉट करण्याचा सूर पापाराझीमध्ये दिसून येत आहे.
advertisement
3/7
एका कार्यक्रमात पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना जया बच्चन यांनी पॅप्सवर टीका केली. त्या म्हणाल्या, "मी मीडियाचं प्रोडक्ट आहे. माझे वडील पत्रकार होते. पण हे पॅपराझी कोण आहेत? कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, नालीतल्या पाईपसारखे टाइट, घाणेरड्या पॅन्ट्स घालून, हातात मोबाइल घेऊन फिरतात आणि फोटो काढतात. हे मीडिया कसे? त्यांचं एज्युकेशन काय? बॅकग्राऊंड काय?"
advertisement
4/7
जया बच्चन यांच्या वक्तव्यावर पपाराझींची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे. पॅप पल्लव पालीवाल म्हणाले, "त्या जे बोलल्यात ते दुर्दैवी आहे. त्यांच्या नातू अगस्त्य नंदाची 'इक्कीस' फिल्म रिलीज होतेय.  प्रमोशनला पॅपराझी नसेल तर काय होईल? अमिताभ बच्चन प्रत्येक रविवारी घराबाहेर येतात ते आम्हीच कव्हर करतो. तिथे कोणी नॅशनल मीडिया नसते. एखाद्याच्या कपड्यांवर किंवा रूपावरून त्याला जज करणं योग्य नाही. डिजिटल युगातल्या बदल त्यांना कळत नसतील किंवा त्या स्वीकारत नसतील तर त्यांच्या टीमने त्यांना समजावायला हवं."
advertisement
5/7
प्रसिद्ध पॅप मानव मंगलानी म्हणाले, "जया मॅडमचा मी खूप आदर करतो.  पण त्यांनी डिजिटल मीडिया समजून घ्यायला हवा. काही युट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्समुळे अव्यवस्था निर्माण झाली आहे. पण ते पॅपराझी नाहीत. सर्वांना एकत्र हिणवणं योग्य नाही."
advertisement
6/7
एका पापाराझीने संताप व्यक्त करत म्हटलं, "आमच्या कपड्यांवरून, भाषेवरून हिणवलं जात आहे. आम्ही कधी सेलिब्रिटींना शिव्या दिल्या नाहीत. आम्हीही मेहनत करणारे लोक आहोत. आम्ही गरीब असू पण आम्हालाही रिस्पेक्ट आहे."
advertisement
7/7
जया बच्चन यांना यापूर्वी अनेकदा पापाराझींसोबत वाद घातला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांनी ट्रोल केलंय. यावेळी काहींनी जया यांचं समर्थन केलंय तर काहींनी त्यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढलेत. आता या सगळ्याचा बच्चन कुटुंबाला त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी फटका बसणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जया यांचं स्टेटमेन्ट बच्चन कुटुंबाला पडणार महागात, पापाराझी उचलणार मोठं पाऊल! म्हणाले, 'त्यांना कळत नसेल तर...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल