TRENDING:

आई-वडील असतानाही प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान करणारे आनंद पिंपळकर आहेत तरी कोण? अभिनेत्रीसोबत काय नातं?

Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे आई-वडील असतानाही तिचं कन्यादान करणारे आनंद पिंपळकर आहेत तरी कोण? अभिनेत्रीशी त्यांचं कनेक्शन आहे?
advertisement
1/7
आई-वडील असतानाही प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान करणारे आनंद पिंपळकर आहेत तरी कोण?
मराठी टेलिव्हिजनवरी लोकप्रिय भूमिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील 'येसूबाई राणीसाहेब'.  या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नुकतीच विवाहबंधनात अडकली.
advertisement
2/7
शंभूराजे खुटवड या हडपसरमधील सुप्रसिद्ध उद्योजकाशी तिचा भव्य आणि राजेशाही थाटात पार पडलेला हा विवाहसोहळा पार पडला. प्राजक्ता गायकवाडचं लग्न सध्या मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
3/7
लग्नाआधीचे कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. प्राजक्ताचा लग्नातील प्रत्येक सोहळा, प्रत्येक क्षण पाहण्यासारखा होता. ती गायकवाड कुटुंबातील एकुलती एक मुलगी असल्याने हा सोहळा कुटुंबासाठी अधिक खास ठरला.
advertisement
4/7
विवाहसोहळा वैदिक पद्धतीने पार पडला. मनोरंजन विश्वातील, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मंडळींनी प्राजक्ताच्या लग्नाला हजेरी लावली होती.  सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी यांच्या उपस्थितीत हे मंगलकार्य संपन्न झाले. लग्नाच्या विधी सुरू होताच प्राजक्ता भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.  
advertisement
5/7
प्राजक्ताचे आई-वडील, मामा-मामी हे सर्व लग्नात सहभागी होते. तरीही प्राजक्ताचं कन्यादान त्यांनी केलं नाही. अनेकांना आश्चर्य वाटलं की आई-वडील असूनही कन्यादानाचा मान कोणाला देण्यात आला? आनंद पिंपळकर यांनी प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान केलं.  
advertisement
6/7
प्राजक्ता आणि आनंद पिंपळकर यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये प्राजक्ताच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांच्या आणि प्राजक्तामधील नातं हे रक्ताचं नसून भावनिक नात्याने जुळलेलं आहे. हीच भावना प्राजक्ता आणि तिच्या कुटुंबालाही होती. त्यामुळे त्यांनी चित्रपटातील नातं वास्तवात उतरवलं आणि प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान केलं. 
advertisement
7/7
विधी दरम्यान आनंद पिंपळकर आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू होते. "काही नाती रक्ताने नव्हे तर ईश्वराच्या अधिष्ठानाने जुळतात. प्राजक्ताच्या रूपात आम्हाला लेकरू लाभलं", असं म्हणत आनंद पिंपळकर आणि त्यांची पत्नींनी भावना व्यक्त केल्या. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आई-वडील असतानाही प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान करणारे आनंद पिंपळकर आहेत तरी कोण? अभिनेत्रीसोबत काय नातं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल