IND vs SA : ऋतुराजची खेळी पाहून आफ्रिकेचा खेळाडू भारावला, शाबासकी देत पाठ थोपटली, मैदानात टाळ्यांचा कडकडाट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडने साऊथ आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतकं ठोकलं आहे.77 बॉलमध्ये ऋतुराज गायकवाडने हे शतक ठोकलं होतं.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडने साऊथ आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतकं ठोकलं आहे.77 बॉलमध्ये ऋतुराज गायकवाडने हे शतक ठोकलं होतं.
advertisement
2/7
खरं तर यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी ऋतुराज गायकवाड मैदानात आला होता.यावेळी विराट कोहलीने ऋतुराज गायकवाडला मार्गदर्सन केलं.ज्यामुळे त्याला मैदानात सेट व्हायला फारसा वेळ लागला नाही.
advertisement
3/7
विशेष म्हणजे एकदा मैदानात सेट झाल्यानंतर ऋतुराजने पहिल्यांदा त्याने 52 बॉलमध्ये आपले अर्धशतक पुर्ण केले होते. या अर्धशतकानंतर त्याने गेर बदलत पुढच्या50 धावा या त्याने 25 बॉलमध्ये केल्या आहेत. अशाप्रकारे आक्रमकपणे त्याने खेळत आपली सेंच्यूरी पूर्ण केली आहे.
advertisement
4/7
ऋतुराज गायकवाडने 77 बॉलमध्ये हे शतक ठोकलं आहे. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 12 चौकार मारले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 129 च्या आसपास होता.त्यानंतर 105 वर तो बाद झाला होता.
advertisement
5/7
दरम्यान शतकानंतर मार्को जन्सने ऋतुराजला टोनी झोर्झीद्वारे कॅच आऊट केले होते. बाद झाल्यानंतर पव्हेलियनकडे जात असताना साऊथ आफ्रिकेच्या केशव महाराज ऋतुराजची शतकीय खेळी पाहून भारावला होता. त्यामुळे त्याने मागून येऊन त्याची पाठ थोपटली होती. या संदर्भातला फोटो आता व्हायरल होत आहे.
advertisement
6/7
खरं तर श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली होती. यांच संधीच सोनं आता ऋतुराज गायकवाडने करून दाखवलं आहे.
advertisement
7/7
ऋतुराजनंतर विराट कोहलीने 102 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 7 चौकार मारले होते. या बळावर भारताचा डाव 250 च्या पार गेला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : ऋतुराजची खेळी पाहून आफ्रिकेचा खेळाडू भारावला, शाबासकी देत पाठ थोपटली, मैदानात टाळ्यांचा कडकडाट