Prajakta Gaikwad: 'येसूबाई'चा आईवडिलांसाठी खास डान्स, पाहून पालकांना अश्रू अनावर, स्टेजवरच ढसाढसा रडली अभिनेत्री!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Gaikwad Wedding: लग्नापूर्वीच्या संगीत सोहळ्यातील एक अत्यंत भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जिथे प्राजक्ताने आपल्या आई-वडिलांसाठी खास डान्स परफॉर्मन्स दिला.
advertisement
1/9

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचे व्यावसायिक शंभुराज खुटवड यांच्याशी २ डिसेंबर रोजी लग्न झाले. या शाही विवाहसोहळ्यातील प्रत्येक विधीची सध्या जोरदार चर्चा आहे.
advertisement
2/9
लग्नापूर्वीच्या संगीत सोहळ्यातील एक अत्यंत भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जिथे प्राजक्ताने आपल्या आई-वडिलांसाठी खास डान्स परफॉर्मन्स दिला.
advertisement
3/9
लग्नाच्या आदल्या दिवशी, १ डिसेंबर रोजी, प्राजक्ता आणि शंभुराज यांचा संगीत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात दोन्ही कुटुंबांनी प्रचंड धमाल केली, पण प्राजक्ताचा डान्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
advertisement
4/9
प्राजक्ताने "सच है कि भगवान है" आणि "धागों से बांदा" या दोन गाण्यांवर डान्स केला. मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या टप्प्यावर तिने आपल्या आई-वडिलांसाठी दिलेला हा डान्स खूपच अर्थपूर्ण होता.
advertisement
5/9
लाडक्या लेकीचा हा खास डान्स पाहून प्राजक्ताच्या आईला आपले अश्रू अनावर झाले. तसेच, प्राजक्ता स्वतः देखील आई-वडिलांसाठी डान्स करताना खूप भावूक झाली होती. सासरी जाणाऱ्या मुलीचे आणि आई-वडिलांचे हे सुंदर बॉण्डिंग पाहून चाहत्यांचे डोळेही पाणावले.
advertisement
6/9
केवळ प्राजक्ताच नाही, तर खुटवड कुटुंबानेही संगीत सोहळ्यात मोठा उत्साह दाखवला. प्राजक्ताच्या सासूबाईंनी लाडक्या सुनेसाठी खास डान्स केल्याचे यावेळी पाहायला मिळाले, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांतील नात्याची वीण अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले.
advertisement
7/9
संगीत सोहळ्यासाठी प्राजक्ताने जांभळ्या रंगाचा सुंदर डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. विशेष म्हणजे, तिने आपल्या आईसोबत ट्विनिंग केले होते, ज्यामुळे त्यांचा लूक अधिक आकर्षक दिसत होता. <strong></strong>
advertisement
8/9
प्राजक्ताच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर, रमेश परदेशी, हार्दिक जोशी यांसारख्या अनेक कलाकारांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
advertisement
9/9
प्राजक्ता गायकवाडने 'स्वराज्यरक्षक संभाजी' व्यतिरिक्त 'आई माझी काळूबाई' मालिकेत आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'स्मार्ट सुनबाई' सिनेमातही काम केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Gaikwad: 'येसूबाई'चा आईवडिलांसाठी खास डान्स, पाहून पालकांना अश्रू अनावर, स्टेजवरच ढसाढसा रडली अभिनेत्री!