TRENDING:

थिएटरमध्ये कोटींची कमाई, OTT ही गाजवलं, प्राजक्ताची 'फुलवंती' आता टीव्हीवर झळकणार

Last Updated:
Prajakta Mali Phulwanti Movie on TV : प्राजक्ता माळीचा फुलवंती सिनेमा पाहायचा राहिलाय. ओटीटीवरही नाही पाहिला आता घरात बसून फ्रीमध्ये पाहू शकणार आहात.
advertisement
1/8
थिएटरमध्ये कोटींची कमाई, OTT ही गाजवलं; प्राजक्ताची 'फुलवंती' आता TVवर झळकणार
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फुलवंती हा सिनेमा काही महिन्यांआधी रिलीज झाला. अनेक दिवसांनी मराठीत उत्तम कथा असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
advertisement
2/8
अभिनेत्री प्राजक्ता आणि गश्मीर महाजनी यांच्या दमदार अभिनयानं भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
advertisement
3/8
आपल्या नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फुलवंती, व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्रींची दर्जेदार कथा सिनेमात दाखवण्यात आली.
advertisement
4/8
सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. 4 कोटी बजेट असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 7.5 कोटींची कमाई केली.
advertisement
5/8
बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर प्राजक्ता माळीचा फुलवंती हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला. ओटीटीवर देखील सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
advertisement
6/8
बॉक्स ऑफिस आणि ओटीटी गाजवल्यानंतर प्राजक्ताचा फुलवंती हा सिनेमा टेलिव्हिजनवर दिसण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
7/8
फुलवंती हा सिनेमा 10 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर टेलिकास्ट केला जाणार आहे.
advertisement
8/8
प्राजक्ताच्या करिअरमधील हा सर्वात महत्त्वाचा सिनेमा ठरला. उत्तम अभिनयाबरोबरच तिनं या सिनेमाची निर्मिती देखील केली आहे. फुलवंती सिनेमासाठी प्राजक्ताला अनेक पुरस्कार देखील मिळाले. नुकताच तिला फिल्मफेअर अवॉर्ड देखील देण्यात आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थिएटरमध्ये कोटींची कमाई, OTT ही गाजवलं, प्राजक्ताची 'फुलवंती' आता टीव्हीवर झळकणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल