Allu Arjun Arrested: पुष्पाचा रिअल लाइफ ड्रामा, बायकोला किस केलं आणि पोलिसांच्या जीपमध्ये बसला अल्लू अर्जुन, PHOTO Viral
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Allu Arjun Arrested: सुपरस्टार अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे “पुष्पा 2” कोट्यवधींचं कलेक्शन करत असताना अल्लू अर्जुनला अटक झालीय.
advertisement
1/7

सुपरस्टार अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे “पुष्पा 2” कोट्यवधींचं कलेक्शन करत असताना अल्लू अर्जुनला अटक झालीय.
advertisement
2/7
“पुष्पा 2” च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एका महिलेला पायदळी तुडवल्याप्रकरणी पॅन इंडियाचा स्टार अल्लू अर्जुन याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
advertisement
3/7
चिक्कडपल्ली पोलिसांनी आज सकाळी घरात जाऊन अल्लू अर्जुनला अटक केली.मात्र पोलिस अल्लूच्या दारात असतानाही त्याचा स्वॅग पाहायला मिळाला.
advertisement
4/7
अटक होऊनही पुष्पाराजचा स्वॅग मात्र कमी झाला नाही. अटकेपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये पुष्पाचा टशन पाहायला मिळाला. पोलिस दारात आणि अल्लू अर्जुन चहा पिताना दिसला.
advertisement
5/7
अटकेआधीच अल्लू अर्जुनला स्पेशल ट्रिटमेंट दिलेली पाहायला मिळाली. अल्लू अर्जुनने पोलिसांसोबत जाताना बायकोच्या गालावर किस केले आणि पोलिस जीपमध्ये चढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
6/7
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला ताब्यात घेतलं आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल केला आहे आणि पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे या घटनेचा तपास सुरु आहे.
advertisement
7/7
अल्लू अर्जुनवर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 105 आणि 118 (1) आणि कलम 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Allu Arjun Arrested: पुष्पाचा रिअल लाइफ ड्रामा, बायकोला किस केलं आणि पोलिसांच्या जीपमध्ये बसला अल्लू अर्जुन, PHOTO Viral