TRENDING:

Radhika Apte on Pune - Hinjawadi : 'हिंजवडीला मी पुणे समजत नाही', असं का म्हणाली पुणेकर राधिका आपटे? स्टेटमेन्ट व्हायरल

Last Updated:
Radhika Apte on Pune - Hinjewadi : मुळची पुणेकर असलेली अभिनेत्री राधिका आपटेनं पुणे-हिंजवडीवर केलेलं स्टेटमेन्ट चांगलंच व्हायरल झालं आहे. ती नेमकं काय म्हणाली पाहूयात.
advertisement
1/9
'हिंजवडीला मी पुणे समजत नाही', असं का म्हणाली पुणेकर राधिका आपटे?
मराठी अभिनेत्री ज्यांनी हिंदीत काम आपलं नाव कमावलं. त्यातील एक अभिनेत्री म्हणजेच राधिका आपटे. राधिकानं हिंदी सिनेमाच नाही तर ओटीटीवर विश्वातही आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
2/9
मुळची पुण्याची असलेली राधिका सध्या नवऱ्याबरोबर विदेशात सेटल झाली आहे. पण भारताची आणि पुण्याची ओढ तिला कायम असते. राधिकामधील अस्सल पुणेकर अजूनही जागा आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे.
advertisement
3/9
राधिकानं पुणे आणि हिंजवडीवर केलेलं तिचं स्टेटमेन्ट चांगलंच चर्चेत आलं आहे. राधिकाच्या आत असलेली अस्सल पुणेकर जागी झाली आणि तिनं पुणे-हिंजवडी या विषयावर थेट स्टेटमेन्ट केलं.
advertisement
4/9
Mashable India शी बोलताना राधिका आपटेला विचारण्यात आलं की, पुण्याच्या डेटिंग सीनवर आजकाल खूप मिम्स तयार होत आहेत, तुला माहिती आहे का? राधिका म्हणाली, "नाही, पण का?" हिंजवडी इज हिंज इन रिअल लाइफ म्हणतात, त्यावर खूप मिम्स येत आहेत.
advertisement
5/9
त्यावर राधिका म्हणाली, "हिंजवडीला मला पुणे नाही वाटत. सॉरी पण मी खूप ओल्ड स्कूल आहे. पुणेकर पुणेकर, हिंजवडी... हिंजवडी."
advertisement
6/9
दरम्यान मागे बसलेला अभिनेता दिव्येंदू शर्मा यानेही गमतीशीर टिप्पणी करत म्हटलं, "मी दहिहंडीला भोसरीला गेलो होतो". त्यावर राधिकाने हसतच उत्तर दिलं, "भोसरी पण पुणे नाहीये यार. जिल्ह्यामध्ये येईल कदाचित…" राधिकाचा हा थेट, बिनधास्त आणि थोडासा विनोदी अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला.
advertisement
7/9
राधिका आपटे मूळची पुण्याची असल्याने तिच्या या स्टेटमेन्टमध्ये अस्सल पुणेकर असल्याचा प्रामाणिकपणा दिसून आला. अनेक पुणेकरांनी राधिकाच्या या थेट स्टेटमेन्टचं कौतुक करत समर्थन केलं आहे.
advertisement
8/9
राधिका आपटे सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळेही चर्चेत आहे.  ती पुन्हा एकदा वेगळ्या आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री राधिका आपटे तिच्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन आयुष्यामुळे चर्चेत आहे. राधिका काही महिन्यांआधी आई झाली. तिने अचानक तिच्या प्रेग्नंसीची माहिती देऊन सगळ्यांना चकीत केलं.
advertisement
9/9
त्यानंतर राधिकाची 'साली मोहब्बत', 'रात अकेली हैं' या नव्या वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. राधिका नेहमीप्रमाणे तिच्या कमाल अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकेल अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Radhika Apte on Pune - Hinjawadi : 'हिंजवडीला मी पुणे समजत नाही', असं का म्हणाली पुणेकर राधिका आपटे? स्टेटमेन्ट व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल