TRENDING:

बदलापूरकरांसाठी मोठी खुशखबर! शहरात येणार मेट्रो; जाणून घ्या स्थानके अन् संपूर्ण रुट

Last Updated:
Mumbai Metro Line 14 : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेमुळे अंबरनाथ बदलापूर पूर्व उपनगर ठाणे नवी मुंबई कनेक्टिव्ही सुधारेल प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे
advertisement
1/7
बदलापूर शहरात धावणार मेट्रो,जाणून घ्या स्थानके अन् रुट
मेट्रो नेटवर्कच्या विस्तारामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मुंबई मेट्रो मार्गिका 14 च्या कामाला येत्या चार महिन्यांत सुरुवात होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
advertisement
2/7
मेट्रो मार्गिका 5, 12 आणि 14 चा थेट फायदा अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना होणार आहे. विशेषतः मुंबई मेट्रो मार्गिका 14 कांजूरमार्ग आणि बदलापूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार असून ही मार्गिका सुमारे 39 किलोमीटर लांबीची असणार आहे.
advertisement
3/7
या मेट्रो मार्गिकेमुळे पूर्व उपनगरांसह ठाणे, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील वाहतूक आणि कनेक्टिव्हीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
advertisement
4/7
या मेट्रो मार्गिकेमुळे कांजूरमार्ग ते बदलापूर हा प्रवास केवळ 40 ते 45 मिनिटांत पूर्ण होईल. सध्या रस्ते आणि रेल्वे प्रवासासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वाहतूक कोंडीचाही प्रश्न सुटणार आहे.
advertisement
5/7
मेट्रो १४ मार्गिकेवर एकूण 15 स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी काही स्थानके भूमिगत तर काही उन्नत स्वरूपातील असतील. यातील 13 स्थानके उन्नत असणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
advertisement
6/7
ही मेट्रो मार्गिका बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागांतून जात अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबई हद्दीत प्रवेश करणार आहे.
advertisement
7/7
मेट्रो 14 मुळे बदलापूर थेट मुंबईशी जोडला जाणार असून नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडी या शहरांशीही थेट संपर्क साधता येणार आहे. तसेच मेट्रो4, मेट्रो 6 आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकासह इतर इंटरचेंजमुळे प्रवाशांना अधिक सुलभ आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
बदलापूरकरांसाठी मोठी खुशखबर! शहरात येणार मेट्रो; जाणून घ्या स्थानके अन् संपूर्ण रुट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल