Actor Life: कॅन्सरमुळे पत्नी गेली, मग 18 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या पडला प्रेमात, 56 व्या वर्षी अभिनेता राहतो लिव्ह-इनमध्ये
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actor Life: बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या दमदार भूमिका करून नाव कमावणारा अभिनेता. ज्याची प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाइफ नेहमीच चर्चेत असते. 56 वर्षांचा हा अभिनेता नेमका कोण आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या दमदार भूमिका करून नाव कमावणारा अभिनेता. ज्याची प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाइफ नेहमीच चर्चेत असते. 56 वर्षांचा हा अभिनेता नेमका कोण आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/8
आपण बोलत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून राहुल देव आहे. त्याच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
3/8
27 सप्टेंबर 1968 रोजी जन्मलेला राहुल देव आज मोठ्या पडद्यावर फारसा दिसत नसला तरी त्याची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून सोशल मीडियावर त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
4/8
राहुलने आपली कारकीर्द मॉडेलिंगपासून सुरू केली आणि नंतर "चॅम्पियन" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकारत राहुलने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अशोका, एल.ओ.सी कारगिल, टॉरबाझ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्याचे काम गाजले.
advertisement
5/8
पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठा धक्का बसला. 1998 मध्ये त्याने रीना देवशी लग्न केले. पण 2009 मध्ये कॅन्सरमुळे रीनाचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर राहुल पूर्णपणे खचला आणि चार वर्षे अभिनयापासून दूर राहिला.
advertisement
6/8
एकाच वेळी सिंगल फादर म्हणून मुलाला वाढवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली.या कठीण काळानंतर राहुलच्या आयुष्यात अभिनेत्री मुग्धा गोडसे आली. दोघांची ओळख एका मित्राद्वारे झाली आणि ती हळूहळू प्रेमात बदलली. 2015 मध्ये राहुलने आपले नाते अधिकृत केले.
advertisement
7/8
राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांच्या वयात सुमारे 18 वर्षांचे अंतर आहे. वयातील या मोठ्या अंतरामुळे हे नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे, परंतु दोघांनीही या फरकाला महत्त्व न देता त्यांचे नाते अधिक मजबूत असल्याचे अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.
advertisement
8/8
सध्या दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. राहुलने अनेकदा स्पष्ट केले आहे की त्याला पुन्हा लग्न करण्याची इच्छा नाही, कारण तो सध्याच्या नात्याने समाधानी आहे. राहुल देव आता OTT प्रकल्पांमध्ये आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे. लवकरच तो श्रिया सरन आणि किच्चा सुदीपसोबत “कब्जा” या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actor Life: कॅन्सरमुळे पत्नी गेली, मग 18 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या पडला प्रेमात, 56 व्या वर्षी अभिनेता राहतो लिव्ह-इनमध्ये