TRENDING:

घरी आलेल्या पाहुण्यांना सलमान खान सर्वात आधी काय विचारतो? काजोलने भाईजानबद्दल सगळंच सांगितलं

Last Updated:
Salman Khan : घरी आलेल्या पाहुण्याला सलमान खान सर्वात आधी काय विचारतो? या प्रश्नावर काजोलने सलमानची सवय सांगितली आहे.
advertisement
1/7
घरी आलेल्या पाहुण्याला सलमान खान सर्वात आधी काय विचारतो? काजोलचा मोठा खुलासा!
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या अंदाजामुळे आणि जबरदस्त ह्यूमरमुळे ओळखला जाणारा सलमान खान सध्या चर्चेत आहे. नुकताच तो अभिनेता आमिर खानसोबत अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच’ या नवीन शोमध्ये दिसला.
advertisement
2/7
Amazon Prime वर नुकताच या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला असून, यात सलमान-आमिरने त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक मजेदार गोष्टी शेअर केल्या आहेत.
advertisement
3/7
काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या या खास शोमध्ये दोन्ही खान बंधूंनी एकत्र हजेरी लावली. शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या सलमान आणि आमिरला काजोल आणि ट्विंकलने खूप चविष्ट जेवण ऑफर केला. टेबलवर दाबेलीपासून वडापावपर्यंत सगळे पदार्थ ठेवले होते.
advertisement
4/7
यावेळी काजोलने सलमान खानच्या एका खास सवयीबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “सलमान खानची एक खूप चांगली सवय आहे. तो त्याच्या घरी आलेल्या पाहुण्याला सर्वात आधी एकच प्रश्न विचारतो: ‘आपण काय खाणार?’”
advertisement
5/7
या शोमध्ये सलमान आणि आमिरने खूप मजा केली. दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या करिअरमधील चढ-उतारांवर मोकळेपणाने गप्पा मारल्या.
advertisement
6/7
सलमान खानने त्याच्या पास्ट रिलेशनशिप्सबद्दलही चर्चा केली. तो म्हणाला की, त्याचे जेवढे ब्रेकअप्स झाले, त्याबद्दल जर कुणाला दोषी धरायचं असेल, तर तो स्वतःलाच दोषी मानतो.
advertisement
7/7
तर आमिर खाननेही त्याची पहिली पत्नी रीना आणि दुसरी पत्नी किरणसोबतच्या घटस्फोटाबद्दल आणि सध्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
घरी आलेल्या पाहुण्यांना सलमान खान सर्वात आधी काय विचारतो? काजोलने भाईजानबद्दल सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल