राज निदिमोरु-समांथाने गुपचूप उरकलं लग्न, दिग्दर्शकाची पहिली बायको कोण? अजय देवगण-आमिर खानसोबत केलंय काम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Who is Raj Nidimoru First Wife: राज निदिमोरु यांचे आधी लग्न झालेले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तिने अजय देवगण, सैफ अली खान, आमिर खान यांच्यासोबत काम केलेलं आहे.
advertisement
1/9

मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रूथ प्रभू आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरु यांनी ईशा योगा सेंटरमधील लिंग भैरवी मंदिरात गुपचूप विवाह केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
2/9
नुकतंच समांथाने या प्रायव्हेट वेडिंग सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेले कित्येक महिने समांथा आणि राज यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. अशातच समांथाने स्वतः त्यांच्या लग्नाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
advertisement
3/9
दरम्यान, राज निदिमोरु यांचे आधी लग्न झालेले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. राज निदिमोरु यांच्या पहिल्या पत्नीचे नाव श्यामाली दे असून तिने अजय देवगण, सैफ अली खान, आमिर खान यांच्यासोबत काम केलेलं आहे.
advertisement
4/9
श्यामाली दे हे मनोरंजन विश्वातील अनेक वर्षांपासूनचे ओळखीचे नाव आहे. विशेष म्हणजे, तिने मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयात पदवी घेतली असली, तरी तिच्या पॅशनने तिला चित्रपटसृष्टीत आणले.
advertisement
5/9
तिने कॅमेऱ्यामागे यशस्वी करिअर उभे केले आहे. श्यामालीने राकेश ओमप्रकाश मेहरा आणि विशाल भारद्वाज यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
advertisement
6/9
तिचे काम केवळ दिग्दर्शनापुरते मर्यादित नाही. तिने पटकथा लेखन आणि क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणूनही अनेक निर्मितींमध्ये योगदान दिले आहे. तिने 'रंग दे बसंती', 'ओमकारा', 'एक नोदिर गोल्पो' यांसारख्या चित्रपटांवर काम केले आहे.
advertisement
7/9
राज निदिमोरु आणि श्यामाली दे यांची भेट याच क्षेत्रातून झाली होती आणि २०१५ मध्ये त्यांचा पारंपरिक पद्धतीने विवाह झाला होता. त्यांना एक मुलगीही आहे. यानंतर वैयक्तिक कारणांमुळे या दोघांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेऊन आपले नाते संपवले.
advertisement
8/9
घटस्फोटानंतरही राज यांनी अनेकदा श्यामालीच्या प्रभावाबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी 'डेक्कन क्रॉनिकल'ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ती त्यांना कास्टिंग निर्णयांमध्ये मदत करते आणि नम्र राहण्यासाठी मार्गदर्शन करते.
advertisement
9/9
समांथा आणि राज निदिमोरु यांच्या अफेअरची चर्चा २०२४ च्या सुरुवातीला सुरू झाली. 'द फॅमिली मॅन सीझन २' आणि 'सिटाडेल: हनी बनी' यांसारख्या प्रोजेक्ट्सवर एकत्र काम करताना त्यांच्यात अधिक घट्ट नाते निर्माण झाले, असे मानले जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राज निदिमोरु-समांथाने गुपचूप उरकलं लग्न, दिग्दर्शकाची पहिली बायको कोण? अजय देवगण-आमिर खानसोबत केलंय काम